Friday, 23 February 2024

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगररचना विभागातील दोन कर्मचारी अटकेत !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगररचना विभागातील दोन कर्मचारी अटकेत !!


कल्याण, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन कर्मचाऱ्यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. नगररचना विभागातील बाळू बहिराम, राजेश बागूल अशी अटक कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बांधकाम मंजुरीसाठी आलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर असून याप्रकरणी पालिकेने तक्रार केली होती.

डोंबिवली महाराष्ट्रनगर मध्ये विनोद बिल्डर्सचे मालक विनोद म्हात्रे, रमेश म्हात्रे, वास्तुविशारद धीरज पाटील यांनी नगररचना विभागात सहा माळ्यांच्या इमारतीचा आराखडा जुलै २०२१ मध्ये मंजुरीसाठी दाखल केला होता. आराखडा दाखल करताना विनोद बिल्डर्सने भूमिअभिलेख विभागाचा बनावट मोजणी नकाशा इमारत आराखड्यासोबत सादर केला होता. या आराखड्यानुसार खासगी जमिनीलगतची गुरचरणीची सहा गुंठे जमीन खासगी मालकीची दाखविण्यात आली होती. आराखडा मंजुरीपूर्वी सर्वेअर बाळू बहिरम, आरेखक राजेश बागूल यांनी संबंधित जमिनीचा प्रत्यक्ष स्थळ सर्वे करून जमिनीचे अचूक रेखांकन करणे आवश्यक होते. मात्र विकसकाने दाखल केलेला प्रस्ताव योग्य असल्याचा शेरा देत आरोपींनी हा प्रस्ताव तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, अभियंता ज्ञानेश्वर आडके यांच्याकडे पाठविला. दरम्यान संबंधित इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर माजी नगरसेवक रमेश पद्माकर म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली. चौकशीदरम्यान भूमी अभिलेख विभागाने विनोद बिल्डर्सने पालिकेत दाखल केलेला नकाशा आम्ही दिला नसल्याचे स्पष्ट केले. 

यानंतर बोगस कागदपत्रासंबंधी नगररचनाकार शशिम केदार यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात विकासक विनोद म्हात्रे, वास्तुविशारद यांच्याविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणात बाळू बहिरम व राजेश बागूल दोषी आढळल्याने बाजारपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली.

परकीय थेट गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परकीय थेट गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️विदर्भ मराठवाड्यासाठी दोन आठवड्यात पावर सबसिडी धोरण

▪️शेतकऱ्यांसाठी पेर्नोड रिकार्ड इंडिया समवेतचा झालेला करार महत्वाचा

▪️२०० मिलियन यूरो पर्यंत गुंतवणुकीतून बुटीबोरी येथे ८८ एकर क्षेत्रावर साकारणार डिस्टिलरी प्रकल्प

▪️८०० युवकांना मिळणार रोजगार

नागपूर, प्रतिनिधी : राज्यातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहावा यादृष्टीने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधांवर भर दिला. एक दूरदृष्टी घेऊन काम उभे केले. या बळावरच महाराष्ट्र राज्य भारतात आघाडीवर आणले होते. मध्यंतरी हे लयाला गेलेले वैभव आम्ही पुन्हा राज्याला प्राप्त करुन दिले असून परकीय थेट गुंतवणुकीतील ४५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

महाराष्ट्र शासन व पेर्नोड रिकार्ड यांच्यात हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रसन्न मोहिले आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देत महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे. कृषी क्षेत्रासह शेतकऱ्यांचेही आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने अन्नप्रक्रिया उद्योग महत्त्वाचे असून बुटीबोरी येथे 88 एकर क्षेत्रावर साकारणारा पेर्नोड रिकार्ड इंडिया डिस्टिलरी प्रकल्प महत्त्वाचा आहे. सुमारे १ हजार आठशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हा प्रकल्प रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारा ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

राज्याच्या विकासासाठी सात क्षेत्र निवडली आहेत. यात कृषीक्षेत्र, स्टार्टअप, आर्टीफिशियल इंटिलीजन्स यावर आम्ही भर दिला आहे. नागपूर येथे आर्टीफिशियल इंटिलीजन्सचे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी गुगलसमवेत काम सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

राज्याच्या समतोल विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रायगड हे राज्यातील गुंतवणुकीचे आकर्षण ठरले आहे. रायगडापासून कोकणातील विकासाच्या वाटा भक्कम केल्या जात आहेत. पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ विदर्भ मराठवाड्यातील उद्योगाला, कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी येत्या दोन आठवड्यात पावर सबसिडी धोरण जाहीर केले जात असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 

▪️परकीय थेट गुंतवणुकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टाई ठरली मोलाची
-  उद्योगमंत्री उदय सामंत

परकीय थेट गुंतवणूक महाराष्ट्रात अधिक प्रमाणात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उद्योग समुहांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. डाहोस येथे झालेल्या परिषदेत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर भर दिल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात उद्योजकांचा विश्वास संपादन करता आला, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.  उद्योग विभागाचे प्रगती पुस्तक राज्यातील उद्योजकांनी समृद्ध केले असून आमच्याप्रती त्यांनी दाखविलेला विश्वास हाच आम्हाला गतीने कामे करण्यासाठी प्रेरणादायी आहे. बुटीबोरी येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी ८८ एकर जागा गरजेची होती. ही जागा अवघ्या ४८ तासात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन उद्योग विभागाने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विदर्भासाठी या प्रकल्पातून एक नवी रुजूवात होत आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शाश्वत विकासासह सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपून आम्ही शेतकऱ्यांना बार्ली लागवड व इतर तंत्रज्ञानाकडे वळवू असे पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले. 

अनाथ मुलांना विविध प्रमाणपत्र वाटपासाठी ५ मार्चपर्यंत पंधरवड्याचे आयोजन !!

अनाथ मुलांना विविध प्रमाणपत्र वाटपासाठी ५ मार्चपर्यंत पंधरवड्याचे आयोजन !!
पुणे, प्रतिनिधी : शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनाथ बालकांना आधारकार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड आदी २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत पंधरवडा राबवून वाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. 

पंधरवडा कालावधीत गरजू अनाथ बालकांनी पंचायत समिती येथील तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, ३ रा मजला, गुलमर्ग सोसायटी, जाधव बेकर्स जवळ, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे -उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे

मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे -उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे

पुणे, प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित स्वच्छता विषयक कार्यशाळेत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे, असे आवाहन स्वीपच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

यावेळी उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत महत्वपूर्ण असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही श्रीमती तांबे यांनी केले. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मतनोंदणी आणि मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली.

मतदानापुर्वी मतदार यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ डाऊनलोड करा. 

Maharashtra DGIPR
Chief Electoral Officer Maharashtra
Election Commission of India 

#VoterHelpLine 
#LokSabhaElections2024

कांबा येथे सुदर्शन होमहवन चे आयोजन, मान्यवरांची उपस्थिती !!

कांबा येथे सुदर्शन होमहवन चे आयोजन, मान्यवरांची उपस्थिती !!

कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली परिसरातील प्रसिद्ध उद्योजक मोहन शेठ, सदाशिव शेठ शेलार, अनिलशेठ शेलार दशरथशेठ म्हात्रे, राकेशशेठ मोरे, प्रसाद शेठ मोरे आदींच्या उपस्थितीत कांबा येथील कार्यालयात सुदर्शन होमहवन चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित जनसमुदाय यांना भोजनदान 'भंडारा, चे देण्यात आले.

कल्याण तालुक्यातील कांबा येथे मोहन शेठ व त्यांचे सहकारी साईबाबा इंटरप्रायजेस च्या माध्यमातून विविध व्यवसाय करतात. त्यांच्या मुळे परिसरात शेकडो गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी, मजूर इत्यादींना हाताला काम मिळाले आहे, कोणाचेही सुख असो अथवा दु:ख हे शेठ धावले नाही असे क्वचितच, दिनदुबळ्यांना मदत नाही असे कधी झालेच नाही, त्यांच्या कांबा येथील कार्यालयात आज श्री लक्ष्मी व श्री गणेश यांची पूजा व होमहवन, सुदर्शन होम चे आयोजन करण्यात आले. सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर दुपारी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मोहन शेठ, सदाशेठ शूठ शेलार, खंबाळपाडा, डोंबिवली, दशरथ शेठ म्हात्रे, अनिलशेठ शेलार, डोंबिवली, राकेशशेठ मोरे, प्रसाद शेठ मोरे, कल्याण, कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच संदिप पावशे, मंगेश बनकरी, उद्योजक छगनशेठ बनकरी, योगेश बनकरी, राजाराम ठाकरे, सोनू यादव, श्री श्री ग्रुपचे सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितीतांनी तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला, या होमहवन मुळे परिसरातील वातावरण भक्तीमय व मंगलमय बनले होते.

Tuesday, 20 February 2024

विद्यार्थ्यांनी कोणताच तणाव ना बाळगता आत्मविश्वासाने बिनधास्त परीक्षेला बसावे __

विद्यार्थ्यांनी कोणताच तणाव ना बाळगता आत्मविश्वासाने बिनधास्त परीक्षेला बसावे __

     विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक  जीवनात अतिशय  महत्वाचा टप्पा आणि पुढील आयुष्याला कलाटणी देणाऱ्या परीक्षा म्हजेच बोर्डाच्या परीक्षा होय. फेब्रुवारी आणि मार्च महिना म्हटलं की हंगाम चालू होतो तो म्हणजे बोर्डाच्या परीक्षांचा .दरवर्षी दहावी - बारावी या बोर्डाच्या परीक्षाही याच काळात असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने HSC आणि SSC या दोन्हींसाठी महाराष्ट्र बोर्ड २०२४ चे वेळापत्रक जारी केले. वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. तर महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा ०१ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेतल्या जातील.

    परीक्षेचा कालावधी जसजशा जवळ येतो तसतसा विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये चिंतेचे, तणावाचे वातावरण निर्माण होत असत. पण चिंता न करता वर्षभरात झालेल्या अभ्यासाची पुन्हा एकांतात बसून मानलावून उजळणी केली तर बराचसा विषय लक्षात ठेवता येतो. त्या उलट विद्यार्थी ह्यांनी चिंतेच्या छत्रछायेत अभ्यासाला बसले तर केलेला अभ्यास सुद्धा लक्षात राहत नाही. आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सुद्धा हेच होत कि, येणारं उत्तर सुद्धा लिहायला गोंधळून जातो. पालकांनी सुद्धा अशा वेळी आपल्या पाल्यासोबत तणावात न राहता  सकारात्मक विचाराने राहावं. दहावीचा हा महत्वाचा टप्पा असाल तरी तो शेवटचा टप्पा आहे असं कधीच मनात आणू नये. मन आणि सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहू देत. त्याचा चांगला परिणाम नक्कीच जाणवेल. 

***अशा वेळी कमी दिवसात परीक्षेची तयारी कशी करू शकतो?

१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या नोट्स तयार करा. परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांची नोट्स करीता धावपळ होते, ही धावपळ टाळण्याकरिता आपण स्वतःच्या नोट्स तयार ठेवल्यास आपला वेळ वाचून आपल्याला अधिक सराव करण्यास मदत होईल. 
२. आपण ठरवलेले अभ्यासाचे  वेळापत्रक पुढे ढकलू नका.
३. उजळणी करताना प्रश्न कधीही वगळू नका. जर तुम्हाला उत्तर माहित नसेल, तर ते एकदा वाचा, ते लक्षात ठेवा, लिहा आणि तुम्हाला ते आठवत नाही तोपर्यंत सराव करा.
४. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित विषय अभ्यासक्रमात, नवीन अभ्यास पुनरावृत्तीसाठी तुमचा वेळ द्या आणि स्वत:ची चाचणी घ्या, निश्चितपणे तुम्ही तुमचे शैक्षणिक उत्तीर्ण होऊ शकता. 
५. फक्त फळे आणि घरीच तयार (कडधान्य, पालेभाज्या) होणारा नाश्ता करण्याचा आणि जेवणाचा प्रयत्न करा. कारण उघड्यावर बनणारे खाद्यपदार्थ तसेच मैदा, बटाटा चिप्स आणि बिस्किटांसारखे स्नॅक्स तुमची मेंदूची शक्ती कमी करतात.
६. हायड्रेटेड राहा (फक्त पाणी प्या, सॉफ्ट / कोल्ड ड्रिंक्स नाही) कारण मेंदू हायड्रेटेड असतानाच सर्वोत्तम कार्य करतो.
७. परीक्षेपूर्वी निरोगी राहण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला सर्दी जरी होत असली तरीही तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही.
८. शक्य असल्यास, विचलित न होता नेहमी एकट्याने अभ्यास करा.
९. रात्री उशिरा अभ्यास करणे टाळा कारण वेळेनुसार मेंदू झोपेची कार्ये आपोआप करू लागतो. त्याऐवजी, सकाळी लवकर उठून (5 ते 6) अभ्यास करा.
१०. महत्त्वाचे मुद्दे चिन्हांकित करताना हायलाइटर वापरा कारण मेंदू साध्या मजकुरापेक्षा चमकदार- रंगीतमध्ये दिसणारे अधिक सहजपणे लक्षात ठेवतो. 
११. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर पहिले सर्व प्रश्न वाचून काढा. त्यांनतर तुम्हाला येणारे आणि सोपे वाटणारे प्रश्न पहिले सोडवा. नंतर कठीण प्रश्नांकडे वळा. सर्वच सोडवत बसलात तर त्यात वेळ निघून जाते आणि कधी कधी सोपे प्रश्न देखील सोडवायचे राहून जातात.  
१२. अगदी आवश्यक नसल्यास टीव्ही, चित्रपट, चॅटिंग, खूप वेळेचे फोन कॉल्स, सोशल मीडिया टाळा. हे तुम्हाला अभ्यासापासून  तुम्हाला दूर नेतील. संगीत वाजवा, किंवा गाणे, किंवा नृत्य करा पण हे फक्त अभ्यासाच्या छोट्या विश्रांती दरम्यान फक्त ध्यान करा. हे तुम्हाला फ्रेश ठेवण्यास मदत करेल. 
१३. आठवड्यात तुम्ही जे काही अभ्यासले आहे ते जाणून घ्या आणि तुम्हाला तपासू शकणाऱ्या एखाद्याला विचारा !!

      विद्यार्थ्यांनी  कोणताच तणाव ना बाळगता केलेला अभ्यास लक्षपूर्वक करून रणनिती तयार करून स्वतःवर विश्वास ठेवा. त्याच आत्मविश्वासाने बिनधास्त परीक्षेला बसा. प्रसन्न मनाने प्रश्नपत्रिका सोडवा. यश नक्की मिळेल आणि तुम्ही परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होवोत यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी मित्रांना या होणाऱ्या बोर्डाच्या  परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! 

श्री. निलेश महादेव कोकमकर (मुंबई)  
पत्रकार, समाजसेवक (+91 99207 38483)

Monday, 19 February 2024

राज्यपाल रमेश बैस व केंद्रीय मंत्री मेघवाल यांच्या उपस्थितीत जैन विश्वभारती विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न !!

राज्यपाल रमेश बैस व केंद्रीय मंत्री मेघवाल यांच्या उपस्थितीत जैन विश्वभारती विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न !!

*शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा - राज्यपाल रमेश बैस* 

नवी मुंबई, प्रतिनिधी : विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थ अर्जनासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तित्व घडण्यासाठी घेतले तरच भारत विश्वगुरू होईल असे राज्यपालांनी सांगितले.   

जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. १९) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. 

दीक्षांत समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य महाश्रमण, जैन विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती तथा केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल, विद्यापीठाचे कुलगुरू बच्छराज दुगड, जैन विश्वभारतीचे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू - साध्वी तसेच स्नातक उपस्थित होते. 

जैन धर्माने नेहमीच शांती, अहिंसा व सामोपचाराचा पुरस्कार केला आहे, असे सांगून, जैन धर्माची शिकवण आजच्या जगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत असून युवकांनी नावीन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्या व आपल्या सामर्थ्याचे योग्य नियोजन करावे असे राज्यपालांनी सांगितले. 

राज्यपालांनी यावेळी जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ तसेच विद्यमानआचार्य महाश्रमण यांच्या मानवसेवा कार्याचा गौरव केला.    

संस्कार व मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य निर्माण कार्य होणार नाही असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावे असे मेघवाल यांनी यावेळी सांगितले. जैन विश्वभारती विद्यापीठाने राष्ट्रीय पांडुलिपी मिशन सफल करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 
 

*आचार्य महाश्रमण यांचा युवकांना मूलमंत्र* 

मनुष्य जीवनात ज्ञानाचे फार महत्व आहे व ज्ञानाइतकी  दुसरी पवित्र गोष्ट नाही.  यासाठी स्नातकांनी ज्ञानसाठी समर्पित व्हावे असे आचार्य महाश्रमण यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितले.  

ज्ञानप्राप्तीमध्ये अहंकार, क्रोध, प्रमाद, रोग व आळस हे मुख्य अडथळे आहेत असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, अहिंसा, नीतिमत्ता, संयम आदी गुणांचा विकास व्हावा, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी जिओ फिनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष कुंदापूर वामन (के. व्ही.) कामत तसेच वेद व जैन आगम शास्त्राचे अभ्यासक प्रा. दयानंद भार्गव यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली.  यावेळी विविध विद्याशाखांमधील पीएच डी स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डोंबिवली महापाल...