Sunday, 22 September 2024

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधिकृत उमेदवारी होणार जाहीर 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार हे पक्षाला खिंडार पाडणाऱ्याना खिंडीत गाठण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. चिपळूण सभेच्या एक दिवस आधी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील हवामानाचा अंदाज तपासण्यासाठी पवार दाखल झाले आहेत. एकेकाळचे निष्ठावंत आज पाठ फिरवून उभे आहेत त्यांच्याकरीता हा पहिलवानी डाव म्हणजे पेचप्रसंग आहे.

         यात कोण कोण चितपट होणार? हा महत्वपूर्ण विषय आहे. पंचाहत्तरी उलटलेल्या उमद्या नेत्याने पुनः पक्षबांधणी करुन राजकीय विश्लेषकांना‌ आपण राजकारणातील चाणाक्ष चाणाक्य आहोत हे पटवून दिले आहे. या सभेत मान. शरदजी पवार काय बोलणार? कार्यकर्त्यांना कोणत्या सुचना करणार? विरोधकांना कोपरखळ्या, कानपिचक्या की आणखी काही देणार याकडे तमाम जनसामान्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही सभा सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात, बहादूर शेख नाका येथे होणार आहे.

        वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट चे संस्थापक मा. प्रशांत बबन यादव यांच्यावर पवार साहेबांनी विश्वास दाखवून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जाहीर घोषणा केली आहे. यादव यांनी संगमेश्वर चिपळूण येथील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी श्वेत क्रांतीचे स्वप्न दाखवले. ओस पडलेले गोठे दुभत्या जनावरांनी पुन्हा भरू लागले आहेत. युवक, महिला, पुरुष शेतकरी हा सुखद अनुभव अनुभवत आहेत. ही सभा राजकीय नेते, कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांची उत्कंठा वाढवीत आहे. उद्या प्रशांत यादव यांची उमेदवार म्हणून अधिकृत घोषना होईल.

         राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्या दीड वर्षी पूर्वी कौग्रेस तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन प्रशांतजी यादव यांनी अधिकृत प्रवेश केला आहे. शरदजी पवार यांच्या गटात पण त्यांनी कमी कालावधी जणसामान्य जनतेला विश्वासात घेऊन थेट ग्रामीण शहरी भागात जनतेशी नाळ जोडली आहे. त्यांनी आपल्या वासिस्ट मिल्क प्रॉडक्ट्स या आपल्या व्यवसायात लक्ष देऊन शेतकरी वर्ग यांना हाताला काम देण्याचे विशेष काम केले आहे. बेकारी दूर करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही आहे. आज चिपळूण ते संगमेश्वर ग्रामीण भागात त्यांनी तुतारी हे चिन्ह घरो -घरो पोचवले आहे. आज 'चिपळूण संगमेश्वर या विधानसभे'मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे.

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनलतर्फे विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य वाटप !!

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनलतर्फे विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1 यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.चे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश जी सकुंडे, मुंबईचे मा.नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023 2024 चे लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे यांच्या आदेशानुसार शनिवार दि.२१/९/२०२४ रोजी श्री सिद्धी विनायक कृपा बिल्डिंग पटागणं न्यू प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे प्रमुख पाहुणे माजी महापौर श्री.महादेव देवळे यांच्या शुभहस्ते व विभाग प्रमुख श्री.महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व कंपास पेटी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मा.महापौर देवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री.महेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास WHRAF चे जनरल सेक्रेटरी श्री. अमोल वंजारे, महाराष्ट्र सचिव सौ.ज्योती ताई भोसले, अध्यक्ष मीरा भाईंदर श्री.स्टिव्हन कार्डोझा, उपाध्यक्ष - मीरा भाईंदर श्री.यश जोशी, मुंबई सचिव श्री. नंदकुमार बागवे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 21 September 2024

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :

         ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या कृष्णा मारुती कदम याना यंदाचा २०२४ वर्षाचा  समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पाक्षिक आदर्श रायगड यांच्या वतीने आयोजित पुरस्कार समारंभात कदम यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजक रमेश सणस, अविनाश म्हात्रे, शैलेश सणस यांनी सांगितले. पक्षिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सांय ५ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय, रोटरी हॉल समोर, वीर बाजीप्रभू देशपांडे, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार साठी संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, वैद्यकीय, क्रीडा आदींचा समावेश केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातून कृष्णा कदम यांना समाजभूषण जाहीर करण्यात आला आहे. गेली तीन वर्ष कृष्णा कदम हे ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत. तसेच अंध, दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. कृष्णा कदम याना या सेवकार्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या  पारस काव्य, कला, जनजागृती संस्था (रजि.) सानपाडा, नवी मुंबईतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार- २०२४ देवून गौरविण्यात येणार आहे. तरी इच्छुक मान्यवरांनी आपले  प्रस्ताव पुढील पत्त्यावर पाठवावे. तसेच राज्यस्तरीय खुल्या काव्यलेखन स्पर्धेकरिता कविंनी १) प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा २) रडते धरणी माता या विषयाना अनुसरून स्वरचित दोन कविता मंगेश चांदिवडे (संस्थापक/अध्यक्ष) पारस काव्य, कला, जनजागृती संस्था (रजि.) लक्ष्मी को.ऑप .हौ. सोसायटी, बिल्डींग नं-३१, तिसरा मजला, रूम नं.१३, सेक्टर-१०, सानपाडा, नवी मुंबई- ४००७०५ येथे ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवाव्यात. अधिक माहीतीसाठी  9769015251 या भ्रमणध्वनीवर दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धा आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !!

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !!

मुंबई (उत्कर्ष एस. गुडेकर) :

            रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या बोंड्ये गावच्या माजी सरपंच, समाजसेविका, अंगणवाडी सेविका ललिता गुडेकर यांच्या मातोश्री वासंती वसंत गुडेकर यांचे शुक्रवार दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
             वासंती वसंत गुडेकर यांच्या निधनाने गुडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तर बोंड्ये गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर आज शनिवारी (दि. २१सप्टेंबर) सकाळी बोंड्ये गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशी मधील विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, दिर असा मोठा परिवार आहे. बोंड्ये ग्रामविकास मंडळ, जावई एकनाथ कदम, कन्या अनिता कदम व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोहन कदम, आंगवली रेवाळेवाडी येथील भावकी दत्ताराम गुडेकर, तुकाराम गुडेकर, पत्रकार शांताराम गुडेकर आणि बंधू परिवार यांच्याकडून वासंती वसंत गुडेकर यांच्या दुःखद निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रविवारी (दि. २२सप्टेंबर) माती सावरणे कार्यक्रम होणार असून बारावे, तेरावे कार्यविधी रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी बोंड्ये येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.

Wednesday, 18 September 2024



महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

या निवडणुकीत १३ हजार ४०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील ३८ मतदान केंद्रांवर आणि ६४ बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे.

मुंबई विद्यापीठ पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२४ यासाठी आखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच या


 वाडा तालुक्यातून रोहन सुधीर ठाकरे व निशा विष्णू सावरा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. 

Tuesday, 17 September 2024

गणेशोत्सव सणात जपली माणुसकी ; देणवाडीतील युवकांचा प्रेरणादायी उपक्रम !

गणेशोत्सव सणात जपली माणुसकी ; देणवाडीतील युवकांचा प्रेरणादायी उपक्रम !

कोकण - ( दिपक कारकर )

प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात,कधी-कधी ती आकस्मिक असतात, काहीजण त्यांचा संघर्ष करतात तर काही यापुढे हतबल होताना दिसतात. अशा प्रसंगी केवळ सामाजिक हिताची भावना जोपसाणारी माणसे, संस्था पाठीशी उभी राहतात. असाच एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे देणवाडी येथील श्री देणेश्वर जय हनुमान नवतरुण विकास मंडळ ( ग्रामीण - मुंबई ) व जय हनुमान क्रिकेट संघ ( देणवाडी ) यांनी हाती घेतला. उपरोक्त मंडळाच्या सदस्यांनी नुकत्याच साजरा झालेल्या गणेशोत्सव सणात वाडीतील दोन दुःखद प्रसंगात असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला. 

देणवाडी गावचे भूमिपुत्र दिपक गु.शिगवण ( वय वर्षे - ३८ ) यांना अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी व काही महिन्यांपूर्वीच मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या स्व.विनोद ता.मांडवकर ( वय वर्षे २६ ) यांच्या पत्नीस व लहान मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी दोन्ही कुटुंबाला आर्थिक स्वरूपात मदत सुपूर्द केली. स्वतः साठी जगता - जगता दुसऱ्यासाठी जगण्याची भावना देणवाडीतील तरुण युवकांनी मनी रुजवत समाजाला आदर्श देणारा उपक्रम पार पाडला. दरम्यान वाडी प्रमुख सोमा निवाते ( गावकर ), मुंबई मंडळाचे अध्यक्ष- सुनिल निवाते, तसेच प्रकाश निवाते, अनिल निवाते, संदीप निवाते, सचिन निवाते, रमेश तांबडकर, रविंद्र शिगवण, महेश धामणे, संदीप निवाते, संजय शिगवण, दिलिप मांडवकर, अनिल मांडवकर, परशुराम दुर्गोळी, तानाजी शिगवण ,अमिर निवाते, अमित मांडवकर, नितिन मांडवकर, निलेश हुमणे, सुभाष शिगवण, मनीष धामणे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपक्रमाचे पंचक्रोशीतुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !! ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ. उरण दि २८...