Monday, 21 February 2022

साईभूमी चाळ रहिवाशी संघ, ( नालासोपारा ) तर्फे विविध कार्यक्रम संपन्न !!

साईभूमी चाळ रहिवाशी संघ, ( नालासोपारा ) तर्फे विविध कार्यक्रम संपन्न !!


मुंबई - ( दिपक कारकर ) :

उपरोक्त रहिवाशी संघातर्फे सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण पूजा निमित्त विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले. दरम्यान महिलांसाठी हळदी कुंकू, रांगोळी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, मनोरंजन खेळ, आदी उपक्रम घेण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी व विजेत्या स्पर्धकांना चाळ कमिटीतर्फे आकर्षक बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे सचिनदादा देसाई ( नगरसेवक ), चंद्रकांत दादा हातीम, ( सर्वेसर्वा - साई कन्ट्रक्शन ), संतोषदादा किर्वे, राजनदादा किणी, यांनी उपस्थिती दाखविली. तसेच चाळीतील सर्व सभासद/महिला वर्ग व बाजूच्या १३ चाळीतील अध्यक्ष व सर्व मंडळी उपस्थित होती. साईभूमी चाळ अध्यक्ष-विनोद शितप, सचिव-अरविंद डावल, खजिनदार-समीर धावडे, कार्याअध्यक्ष-दिलीप जोशी व सदस्य व समस्त कमिटीतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या साईभूमी चाळ कमिटीतर्फे राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार ; वैभव कडू यांची स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी !!

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार !! वैभव कडू यांची स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी. समुद्रकिनारी विसर्जनचा रस्ता करून दिला मोकळा...