Monday, 1 August 2022

श्रावण सोमवार निमित्ताने श्री घुटेकेश्वर महादेव मंदीरात भाविकांची गर्दी !

श्रावण सोमवार निमित्ताने श्री घुटेकेश्वर महादेव मंदीरात भाविकांची गर्दी !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे घुटकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी वाकडपाडा पंचक्रोशीतील जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे देवस्थान भाविकांना व पर्यटकांना मोहीत करते. आज परीसरातील अनेक भाविक या ठिकाणी आले होते. वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या तिर्थ क्षेत्राची सफर शिक्षकांनी घडविली.
यावेळी प्रदीप वाघ देवस्थान समितीचे अध्यक्ष यांनी सर्वांचे स्वागत केले व मंदीरांच्या उभारणी चा इतिहास सांगितला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक दिनकर सर मुख्याध्यापक, निलेश गांगवे, शतानंद भेरे, शाम फेसाळे, हर्षदा खादे, देवराम वाघ उपस्थित होते.

आज भाविकांची व विद्यार्थ्यांना फराळाची व्यवस्था अशोक वाघ, हर्षल काळे, अंकुश वाघ, भरत फसाळे, व गावातील तरुण मंडळी यांनी केली होती. कार्यक्रमासाठी प्रदीप वाघ, संजय वाघ, भानुदास वाघ, सविता वाघ, पुजा वाघ, वेणुताई वाघ, कमल वाघ  यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे दुःखद निधन !

पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे दुःखद निधन !  मुंबई (शांताराम गुडेकर) :             आगासन गाव येथील शांत, सरळ व्यक्तिमत्व असणारे पां...