Thursday, 5 November 2026

ॲड. जितेंद्र जोशी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घेतली भेट; काळू नदीतील गाळ उपसा आणि सुशोभीकरणाची मागणी !!

ॲड. जितेंद्र जोशी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घेतली भेट; काळू नदीतील गाळ उपसा आणि सुशोभीकरणाची मागणी !!

*मुंबई, प्रतिनिधी :* ॲड. जितेंद्र जोशी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या मलबार हिल, मुंबई येथील सेवासदन निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी काळू नदीमध्ये साचलेल्या गाळाचा उपसा करून नदीची खोली व पात्र वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीवर जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव यांना प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. तसेच त्यांनी सदर निवेदनावर तसा शेरा मारला.

त्याचबरोबर ॲड. जोशी यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनाही काळू नदी सुशोभीकरण करण्याचे निवेदन दिले.

तसेच संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासह टिटवाळा येथे सुरू असलेल्या पाणीटंचाईकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment

चेतना महाविद्यालयाची ‘मॅरेथॉन’ ठरली नवी मुंबई करंडक २०२६ ची मानकरी !!

चेतना महाविद्यालयाची ‘मॅरेथॉन’ ठरली नवी मुंबई करंडक २०२६ ची मानकरी !! पुण्याच्या ‘पहिली रात्र’ एकांकिकेला द्वितीय, तर ठाण्याच्या...