मागील आठ वर्षे सातत्याने मराठी भाषा संवर्धन आणि भाषा प्रचार-प्रसारासाठी झटणाऱ्या साहित्यसंपदाचा वर्धापनदिन लवकरच चिंचवड, पुणे येथे पार पडणार आहे. त्या निमित्ताने संस्थापक वैभव धनावडे यांनी समाजात विशेष छाप सोडणाऱ्या साहित्यसंपदा प्रकाशनाच्या पुस्तकांना आणि समाजात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत.
*साहित्यिक पुरस्कार*
- *कै. सौ. मखमल श्रीरंग सोनवणे स्मरणार्थ उत्कृष्ट कथा लेखन पारितोषिक :* ‘तो आलाय’ कथासंग्रह - श्री. किरण बोरकर
- *कै. श्रीरंग रामचंद्र सोनवणे स्मरणार्थ उत्कृष्ट मुखपृष्ठ पारितोषिक :* ‘आता जाऊया सूर्यावर’ - मुखपृष्ठकार : मनोमय मीडिया
- *कै. सौ. प्रतिभा विनायक शेरखाने स्मरणार्थ उत्कृष्ट काव्यसंग्रह :* ‘ही माती माझ्या यात्रेची विठाई’ - श्री. चारुदत्त चिखले
- *कै. सुरेंद्र बालंखे लक्षणीय लेखसंग्रह पुरस्कार २०२६ :* ‘शब्द दरवळ’ - श्री. सुनील चिटणीस
- *कै. गौरव अनिल नानोटी स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय बालकथा संग्रह पुरस्कार २०२६ :* ‘पिकलपोनि’ - रमा जाधव
- *कै. गौरव अनिल नानोटी स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार २०२६ :* ‘प्रतिभेच्या वाटेवर’ - श्री. प्रथमेश कासार
- *सौ. नीलम सावंत पुरस्कृत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार २०२६ :* ‘नादखुळा’ - श्री. रमेश धनावडे आणि ‘दीपस्तंभ’ - सौ. करुणा पांचाळ
- *कै. अनिल देशपांडे स्मृती प्रित्यर्थ काव्य प्रेरणा पुरस्कार २०२६ :* ‘कैवल्याचे डोही’ - श्री. दिलीप मोकल आणि ‘जाणिवांच्या वाटा’ - अस्मिता सावंत
- *कै. मनीषा संजय पाटील स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार २०२६ :* ‘सागरी किनारा’ - सौ. भावना काळे आणि ‘हितगुज मनाचे मनाशी’ - सौ. पल्लवी कोळी
- *कै. मंजुषा प्रदीप कोरंगळेकर स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार :* ‘शब्दोत्सव’ - सौ. सोनाली जगताप आणि ‘आता जाऊया सूर्यावर’ - कविता झुंजारराव
- *कै. कमलाबाई पाटील पुरस्कार :* मंजुळा म्हात्रे - ‘मंजुळाक्षरे’ पुस्तकासाठी
*सामाजिक आणि विशेष सन्मान*
- *कै. डॉ. अनुपमा दिलीप धनावडे स्मृती प्रित्यर्थ साहित्यसंपदा मराठी दीपस्तंभ :* कोमसाप शाखा, उरण
- *कै. डॉ. अनुपमा दिलीप धनावडे स्मृती प्रित्यर्थ साहित्यसंपदा युवा प्रेरणा पुरस्कार :* श्री. निखिल कोलते, कोषाध्यक्ष - मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान
- *कै. डॉ. अनुपमा दिलीप धनावडे स्मृती प्रित्यर्थ साहित्यसंपदा युवा प्रेरणा पुरस्कार :* श्री. प्रमोद सूर्यवंशी, संपादक - आम्ही मुंबईकर
*साहित्यसंपदा आधारवड सन्मान*
सातत्याने लिखाण करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांना ‘साहित्यसंपदा आधारवड’ सन्मान जाहीर झाला आहे. यामध्ये *अमृता देखणे, सीमा हरकरे, शशिकांत पाटणकर, छाया दीक्षित, स्मिता पेशवे* यांचा समावेश आहे.
सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह / सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे असून जाहीर कार्यक्रमात त्यांचे वितरण करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
वृत्त - प्रमोद सुर्यवंशी
No comments:
Post a Comment