उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या धरणगाव सभेने शिवसेनिकांना उत्साहाचे बळ !
जळगाव, अखलाख देशमुख : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सौ.सुषमाताई अंधारे यांची मंगळवार, दि.१ नोव्हेंबर २०२२ रोजी धरणगाव येथे प्रचंड जाहीर सभा झाली. यामुळे शिवसेनिकामध्ये उत्साह वाढला आहे.या सभेला जळगाव शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब, प्रथम नागरिक तथा जळगावच्या महापौर तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री महाजन, जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, शिवसेना जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक व धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरद दादा कोळी, पालघर जिल्हा लोकसभा संघटक जनार्दन पाटील, महिला आघाडीच्या सौ. महानंदाताई पाटील, जळगाव लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, युवासेनेचे सहसचिव विराज अशोक कावडिया, माजी नगराध्यक्ष गजानन मालपुरे, युवासेना जिल्हा यव अधिकारी निलेश चौधरी, सुरेश चौधरी यांच्यासह धरणगाव व एरंडोल तालुक्यातील शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment