Sunday, 10 November 2024

कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार - खासदार डॉ श्रीकांत शिंदे

कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार - खासदार डॉ श्रीकांत शिंदे 


डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला व सांगितले राजेश मोरे यांच्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिंदे शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्यालाही न्याय दिला जातो. असे सांगत महायुतीचे सर्व कार्यकर्ते कल्याण लोकसभा मतदारसंघात जोमाने कामाला लागले आहेत. या मतदारसंघातील महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, तसेच आपल्या सुखदुखात सदासर्वकाळ धाऊन येणारा, भेटीची वेळ न घेता भेट देऊ शकणारा आणि आपल्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहणाऱ्या राजेश मोरे यांच्यासारख्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन खा. डाॅ. शिंदे यांनी केले. हे 

यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख महेश पाटील, राष्ट्रवादीचे ॲड. बह्मा माळी, महिला आघाडीच्या लता पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, गुलाब वझे, भाजपचे ग्रामीण प्रमुख नंदू परब उपस्थित होते.








No comments:

Post a Comment

कल्याण पश्चिम विधानसभा लढत झाली एकतर्फी !! ** आमदारांनी मतदारसंघात केलेला विकास तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची लोकप्रियता  ** प्रचार सभां...