कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन !
** संजय, अजय, आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर
मुंबई (प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व. हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित्री ह.कारकर ( वय वर्षे -६५ ) यांचे आज मंगळवार दि.१२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.१५ वा.सुमारास निधन झाले. काही महिन्यांपूर्वीचे त्यांचे पती गावचे गुरव हरिश्चंद्र कारकर यांचे निधन झाले.
स्व.सावित्री ह.कारकर म्हणजे संजय, अजय, आदित्य यांच्या आई होत.. अतिशय संस्कारमयपणे त्यांनी आपल्या मुलांना सांगोपीत करून शिक्षण दिले. मुलं - नातवंडे यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या होत्या. वाडीत सर्वांशी प्रेमाने वागणं - बोलणं हा त्यांचा स्वभाविक गुणधर्म अनेकांना प्रिय होता. सद्यस्थितीत त्यांच्या आजारपणात त्यांस बरं करण्यास मुलांनी प्रचंड परिश्रम घेतले अखेरीस आज त्या देवाला प्रिय झाल्या.त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना - नातवंडे असा मोठा परिवार आहे. सर्व गावकरी गुरव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून आईला समस्त "कातळवाडी ग्रामीण - मुंबई मंडळातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी त्यांच्यावर मुर्तवडे कातळवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment