Friday, 30 May 2025

रोहीणी नक्षत्र झाले सुरू, शेतकरी पेरणी लागला करू !!

रोहीणी नक्षत्र झाले सुरू, शेतकरी पेरणी लागला करू !!

** अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकरी मात्र झाला हैराण

कोकण, (शांताराम गुडेकर)

            दरवर्षी वाट पाहायला लावणारा पाऊस अवकाळी रूपाने लावणी वेळी जुलै महिन्यात पडणार्या धोधो पावसाप्रमाणे पडला व त्यामुळें पावसाळ्यासाठी करावयाची साठवण कामे शिल्लक राहिली. तेवढ्यातच रोहीणी सुरु झाले. परंतु पाणीच पाणी झालेल्या शेतात पेरणी करतांना शेतकरी कसरत करत असल्याचे दिसले. ट्रॅक्टरने नांगरणी अलिकडे होत असली तरीही अजूनही  बैलांचे नांगर बघायला मिळत आहे.
          पेरणीचे रोहीणी नक्षत्र सुरु झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख, आंगवली, मारळ, कासार कोळवण, बामणोली, बोंडये तसेच धामणी, गोळवली तुरळ परिसरात शेतकरी प्रत्यक्ष  बियाणे पेरणी करू लागला आहे.

No comments:

Post a Comment

गावात शिक्षकांना आदर राहिला नाही, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांचे परखड मत !

'गावात शिक्षकांना आदर राहिला नाही, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांचे परखड मत ! कल्याण, (संजय कांब...