Monday, 30 June 2025

कौतेय प्रतिष्ठान तर्फे दुभाषी मैदानात केली स्वछता !

कौतेय प्रतिष्ठान तर्फे दुभाषी मैदानात केली स्वछता !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         विलेपार्ले पूर्व येथील वामन मंगेश दुभाषी मैदान येथे  गेले अनेक शनिवार रविवार काही समाजकंटकांकडून मद्यसेवन केले जात असल्याचा तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. आज त्याठिकाणी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडला. तेथील एकमेव सुरक्षारक्षक व महिला सफाई कर्मचारी ह्यांच्याकडून तिथे होत असलेल्या सर्व गैरप्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन सदर गोष्टीची लेखी तक्रार करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पार्लेकर नागरिकांच्या सुरक्षेला ह्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो हे सुद्धा निदर्शनास आणून देण्यात आले. ह्यावेळी अध्यक्ष कौतेय देशपांडे. सौ डॉली देढीया -देशपांडे, दुर्गेश कुलकर्णी, चंद्रेश परमार, भरत मौर्य, चंद्रकांत सोळंकी, विजय शर्मा सदस्य उपस्थित होते. पार्लेकर दक्षतेसाठी तेथे उपस्थित अनेक पारलेकरांनी कौतेय प्रतिष्ठानचे कौतुक करुन आभार मानले.

भटवाडी येथील फुटपाथवरील अनधिकृत बांधकामाचा बेस्ट बसला अडथळा, मनपा विभागाने फुटपाथवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची स्थानिकांची मागणी !!

भटवाडी येथील फुटपाथवरील अनधिकृत बांधकामाचा बेस्ट बसला अडथळा, मनपा विभागाने फुटपाथवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची स्थानिकांची मागणी !!

घाटकोपर, (सुभाष कोकणे) : घाटकोपर पश्चिम भटवाडी येथे मुंबई महानगर पालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी मंडई बांधून दिलेली असलेली तरी देखील हे भाजी विक्रेते तसेच अन्य वस्तू विक्रेते हे रस्त्यावर फुटपाथ वर येऊन आपला बाकडा लावून भाजी व इतर साहित्य घेऊन विक्री करण्यास बसत आहेत. त्यामुळे घाटकोपर स्टेशन वरून येणाऱ्या तसेच कांदिवली, वरळी येथे जाणाऱ्या मोठ्या बेस्ट बसेस यांना वळणावर वळण घेण्यास बेस्ट चालकास मोठी कसरत करावी लागते. परिणामी याठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी राम जोशी मार्ग रस्ता हा रुंद करण्याची आवश्यकता आहे अशी स्थानिकांची मागणी आहे. तसेच यासाठी वाहतूक शाखेने देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी. 

रस्ता लहान निमुळता असल्यामुळे बेस्ट बस ला याठिकाणी वळण घेता येत नाही,  कारण पुढे फुटपाथवर आलेले अनधिकृत बांधकाम हे महत्त्वाचे कारण ठरत आहे.परिणामी (ता.३० जून) रोजी सकाळी बाबू गेनू मंडई येथील राम जोशी मार्गावर बेस्ट बस नंबर MH01 - CR - 3061 ही बेस्ट बस वळण घेत असताना बंद पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. महानगर पालिकेने हे फुटपाथ वरील अनधिकृत बांधकाम खाली करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशी यांनी लोकप्रतिनिधी व महानगर पालिका अधिकारी यांच्याकडे करत आहेत.

मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती -मुंबई कार्यकारिणी जाहीर !!

मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती -मुंबई कार्यकारिणी जाहीर !! 

** अध्यक्षपदी संजय बेंद्रे तर कार्याध्यक्षपदी अजित गोरुले (मारळ) आणि सचिव पदी योगेश घोलम यांची निवड

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेले मार्लेश्वर देवाच्या नावाने होतकरू, हौशी क्रिकेट युवकांनी मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती स्थापन केली असून या समिती तर्फे मुंबई विभागसाठी  २०२५-२०२७ या कालावधीसाठी आपली कार्यकारणी नुकतीच जाहिर केली. मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती - मुंबई  कार्यकारिणी कार्यकाल २०२५ ते २०२७ असून यामध्ये नवनियुक्त पदाधिकारी निवडीत अध्यक्ष म्हणून  संजय बेंद्रे (निवधे), तर कार्याध्यक्ष म्हणून अजित गोरुले (मारळ), तसेच उपाध्यक्षपदी विशाल शिवगण (हातिव), महेश शिंदे (ओझरे),सचिव म्हणून योगेश घोलम (खडी कोळवण), सहसचिव पदी प्रणव रेवाळे (आंगवली), प्रभात गुरव (बामणोली), आणि खजिनदार म्हणून राजेश गुरव (निवधे),
सह-खजिनदार विठोबा घवाळी (निनावे), हिशोब तपासनीस पदी सुशील गुरव (ओझरे), तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून
प्रदीप तोरसकर (कासार कोळवण), शशांक हातिम (ओझरे) यांची निवड करण्यात आली.
          कार्यकारणी निवड झाल्यावर काही चर्चेतील ठळक मुद्दे व निर्णय ठरवण्यात आले. यामध्ये प्रत्येक गावातील संघाने मुंबईत किमान एक स्पर्धा आयोजित करावी.एकाच गावातील विविध संघांतील खेळाडूंना त्या गावाच्या इतर कोणत्याही संघात खेळण्यास मुभा.यासह अनेक महत्त्वाच्या बाबींवर एकमताने निर्णय घेण्यात आले.यनिमित्ताने
एंजॉय आंगवली क्रिकेट संघाचे प्रतिनिधी म्हणून गावाहून उपस्थित राहिलेले ग्रामीण कमिटी सचिव श्री.रणजीत पवार यांचे मुंबई कमिटीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सभेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल योगेश सालप यांचे आणि मुंबईतील क्रिकेटप्रेमी  रितूभाई चंदेलिया यांचे अध्यक्ष संजय बेंद्रे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
                अध्यक्षीय मार्गदर्शन मध्ये संजय बेंद्रे यांनी समितीच्या भविष्यातील उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.तर सचिवीयांनी समारोप करताना सर्व नवनियुक्त पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे अभिनंदन करून पुढील क्रिकेट कार्यास शुभेच्छा दिल्या. योगेश घोलम यांनी सभेची सांगता करत सर्व उपस्थितांचे आभार मानले. ही सभा संपूर्णपणे मैत्रीपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती -मुंबई कार्यकारिणी जाहीर होऊन अध्यक्षपदी संजय बेंद्रे तर कार्याध्यक्षपदी अजित गोरुले (मारळ) आणि सचिव पदी योगेश घोलम यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील सर्व क्रिकेट सामने आणि विविध उपक्रम यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sunday, 29 June 2025

शाखा प्रमुखांचे ग्रामीण भागात मोठे योगदान - भास्कर जाधव.

शाखा प्रमुखांचे ग्रामीण भागात मोठे योगदान  - भास्कर जाधव.

उरण, दि २९, (विठ्ठल ममताबादे) : शिवसेना पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे.ग्रामीण भागात सर्वच नागरिकांसोबत संवाद साधण्याचा महत्त्वाचा दुवा  शाखाप्रमुख आहे. शिवसेनेचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवायचे असेल तर शाखाप्रमुखांनी मतदारांशी, नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधून शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे. त्यासाठी शाखाप्रमुख पद व त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र कालांतराने शाखाप्रमुख हा काम करीत नसल्याने कमकुवत झाला. अनेक ठिकाणी शाखाप्रमुख काम करत नसल्याने त्या त्या भागातील नागरिकांशी मतदारांशी त्यांच्या संवाद तुटला आहे. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो तिथे मात्र शाखाप्रमुख पाहिजे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीत त्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे. शाखा प्रमुखाचे ग्रामीण भागात खूप मोठे योगदान आहे हे कोणी विसरून चालणार नाही आता मात्र शाखाप्रमुखांना चार्ज करायची वेळ आली आहे. असे परखड व आक्रमक मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे मांडले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोट बांधण्यासाठी व पुढील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप येथे करण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव बोलत होते. भास्कर जाधव यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, कोकण युवा सेना प्रमुख- शिरसाठ,जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा निहाय वक्ता मनीषा ठाकूर, रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, मेघा मिस्त्री, ज्योती म्हात्रे-  संघटिका, शिव विधी व न्याय सेवा उरण तालुका वर्षा पाठारे, उरण तालुका संघटक बी एन डाकी, पनवेल तालुका प्रमुख महेंद्र गायकर, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, संपर्क प्रमुख दिपक भोईर, द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक महेश वर्तक, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार घरत, उरण शहर संघटक संदीप जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भास्कर जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना महायुतीच्या विविध योजना, निर्णयावर कडाडुन टीका केली. भाजपा ने राज्यात सुरू असलेल्या परिवहन सेवेच्या महामंडळाचे सरकारीकरण करण्याचे वचन दिले होते ते वचन पूर्ण केले नाही शिवाय कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार थकविले आहे. कृषी कर्जमाफीचा आश्वासन दिले होते ते अजूनही पूर्ण झाले नाही योग्य वेळ आल्यावर कृषी कर्ज माफ करू असे सांगतात पण ते योग्य वेळ कधी येईल ? महिलांना महिन्याला २१००  रुपये देणार असे सांगितले तिथेही लाडक्या बहिणीची फसवणूक केली. निवडणुकीच्या तोंडावर ही अशी  योजना त्याने सुरू केली. सरकारचे महिलांच्या मतावर डोळा आहे त्यामुळे योजना सुरू केली. शासनाला लाडक्या बहिणीशी काहीही देणे-घेणे नाही भाजपा सरकारने सर्वच समाजाला नवीन महामंडळ दिली. अगोदरच अनेक महामंडळ बंद केली मात्र ही नवीन महामंडळ कशासाठी स्थापन केली ? शासन आर्थिक तोट्यात असताना केवळ विविध जाती धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी ही प्रत्येक समाजासाठी नवीन महामंडळ स्थापन करण्यात आली. मराठा ओबीसी समाजात भांडण लावून समाजात फूट पाडले.नको ते आश्वासन देऊन जनतेची समाजाचे दिशाभूल केली. मराठा ओबीसी समाज एकमेकाविरोधात उभे केले. त्यामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले. नोकर भरती न झाल्याने बेरोजगारी वाढली. रोजगार नसल्याने,नोकरी नसल्याने बेरोजगार तरुणांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे . मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते आश्वासन पूर्ण केले नाही उलट राज्यात वीज दरवाढीचे प्रयत्न सुरू आहेत जाती धर्मात भांडणे लावले त्यामुळे अशा जनतेची फसवणूक करणारा पक्षापासून सावध रहा असा सल्ला मार्गदर्शन प्रसंगी नेते भास्कर जाधव यांनी दिला.तसेच मी शिंदे गटाप्रमाणे सुरतला गेलो किंवा गुवाहाटीला गेलो तर राजकारणातुन निवृत्ती होईन. माझ्या विरोधात वेगवेगळे कट कारस्थान रचले जात आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खोट्या पुरावाच्या आधारे जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मी शिवसैनिक असल्याने खंबीर आहे. आयुष्यात कोणतेही चुकीचे काम केले नसल्याने मी अशा गोष्टींना घाबरत नाही. सर्वांना विनंती करतो की मराठी माणसांने वेळीच सावध व्हा अन्यथा आपले अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही असे आवाहनही भास्कर जाधव यांनी केले. यावेळी भास्कर जाधव यांनी नवी मुंबई विमानतळ, मराठी भाषा, हिंदी भाषा सक्ती आदी विविध विषयावर  मार्गदर्शन केले.

या मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी आपल्या ओघवती शैलीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्याशी संवाद साधला. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शिवसैनिक हा निष्ठावंत आहे. गितेच्या तत्वा प्रमाणे काम करा.मतदाराची प्रत्येक यादी ही एक गीता आहे. तीचा चांगला व सखोल अभ्यास करा. ती आत्मसात करा. शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे. शिवसेनेचे विचार व कार्य अजराअमर आहेत कोणीही आले तरी शिवसेना संपणार नाही. ज्याने ज्याने शिवसेना सोडली त्यांनी ते स्वतःच्या स्वार्थासाठी सोडली. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी स्वार्थासाठी शिवसेना सोडली. अशी चूक तुम्ही करू नका. टाळ्या वाजविणे किंवा घोषणा देणे सोप्पे असते पण प्रत्यक्ष काम करणे कठीण असते अगोदरच्या काळात निष्ठेला किंमत होती आता मात्र निष्ठेलाही किंमत नाही, शिवसेना पक्षात पद हे काम करण्यासाठी आहे पद हे मिरविण्यासाठी नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका जवळ आले आहेत आता सर्वांनी कामाला लागा. महाविकास आघाडी वर अवलंबून राहू नका कोणत्याही क्षणी शिवसेनेचाच पदाधिकारी निवडून येणार या आत्म विश्वासाने काम करा. कोरोना काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळेच मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी आहे. मुस्लिम समाजामुळे शिवसेनेचे अनेक नेते खासदार आमदार निवडून आले आहेत. आयुष्य भर ऍडजस्टमेंट केल्यानेच शेतकरी कामगार पक्ष संपला आहे. प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेता न आल्याने शेतकरी कामगार पक्ष संपल्यातच जमा आहे. आपल्याकडून गद्दारी होता कामा नये आम्ही दिलेल्या फॉरमॅटमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम करावे यश तुम्हालाच मिळेल. पैशाने लीडर लोक विकले जातात पण सर्व सामान्य मतदार कधीच विकला जाणार नाही. यामुळे सर्वांनी कामाला लागा असा आदेश विश्वनाथ नेरूरकर यांनी मार्गदर्शन करताना दिले. यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.मला राजकारणाचा कोणताही गंध नव्हता तरी राजकारणात आलो. जनतेने मला २०१४ साली आमदार बनवले. त्यापूर्वी वेगवेगळे पदे भूषविली.निवडणुकीत झालेला पराभव हा माझा नाही. पैशांमुळे माझा पराभव झाला. येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका जिंकल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. सर्वांनी आतापासून तयारीला लागा असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी विविध मान्यवरांची  भाषणे झाली. भाषणे संपताच महाराष्ट्र शासनाने हिंदी विषय सक्ती केल्याने शासनाचा निषेध करत त्या निर्णयाची होळी करण्यात आली. शासनाचा हिंदी सक्तीचा जी आर (शासन निर्णय )जाळण्यात आला. या मार्गदर्शन मेळाव्याला उरण पनवेल खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरला होता. महिला भगिनींचीही उपस्थिती लक्षणीय होती. अतिशय सुंदर व जोशपूर्ण असा हा मार्गदर्शन मेळावा होता. या मेळाव्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्याचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या मेळाव्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

करळफाटा येथील जेएनपीटीचा सर्विस रोड बनला दारुड्यांचा अड्डा !!

करळफाटा येथील जेएनपीटीचा सर्विस रोड बनला दारुड्यांचा अड्डा !!

** खुलेआमपणे दारू चरस गांजाचे सेवन.

** महिला वर्ग ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - भविष्यात खूप मोठी घटना घडण्याची शक्यता .....

** कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने सर्व्हिस रोडवर मद्यपी व व्यसनी लोकांचा नेहमी वावर.

** महिलांनी काढला सर्व्हिस रोड वर मोर्चा.

उरण, दि २९, (विठ्ठल ममताबादे) : दिवसेंदिवस उरण तालुक्यात अनेक गुन्हे वाढत असून प्रशासनाचे यावर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नाही. त्यातच उरण तालुक्यात अनेक ठिकाणी खुलेआम पणे सर्व्हिस रोडवर, सार्वजनिक ठिकाणी मद्यपी व्यसनी लोक बिनधास्तपणे ग्रुप करून दारू पीत असून मोठ्या प्रमाणात नशा सुद्धा करत आहेत. दारू पीत असताना तिथेच गांजा अफू चरसचे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सेवन करत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. उरण तालुक्यातील करळ फाटा हे अति महत्त्वाचे स्थान आहे.उरण मध्ये येण्यासाठी व उरण मधून बाहेर जाण्यासाठी नागरिकांना या स्टॉप वरूनच पुढचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक करळ फाट्यावरून प्रवास करीत असतात. गावातील महिला, शाळा कॉलेजमधील मुल-मुली,ज्येष्ठ नागरिक हे देखील इथूनच प्रवास करीत असतात मात्र करळ फाट्यावर जेएनपीटी प्रशासनाच्या सर्विस रोडलगत मद्यपी, दारुडे हे दारू, गांजा, चरस, अफू आदी नशेच्या पदार्थ्यांचे सेवन करत आहेत. त्यामुळे व्यसनी लोकांचा वापर येथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मद्यपी व्यसनी लोकांची या परिसरात दादागिरी हुकुमशाही वाढली असून सदर मद्यपी व्यसनी व्यक्ती ग्रुप करून एकत्र बसून खुलेआमपणे दारू पीत, गांजा ओढत रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे सोनारी, करळ व आजूबाजूच्या गावांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर रस्त्यावरून घरी जाताना महिलावर्ग शाळा कॉलेजमधील मुलींना शरमेने मान खाली घालून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हे दारू पिणारे व गांजा ओढणारे व्यसनी व्यक्ती शाळा कॉलेज मधील मुलींकडे,महिलांकडे वाईट नजरेने पाहत असल्याने महिलांना धोका निर्माण झाला आहे. 

संध्याकाळी ६ वाजले की हे लोक रस्त्यावर सर्विस रोड जवळ बसतात व रात्री बारा एक वाजेपर्यंत हे लोक ग्रुप करून दारू पिण्यासाठी खुलेआमपणे बिनधास्त बसतात. त्यांना कोणाचेही भीती वाटत नाही. शासनाची ना कायद्याची कोणाची भीती त्यांना वाटत नाही. कोणाचाही वचक त्यांच्यावर राहिला नाही. त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस करळ फाटा येथे जेएनपीटीच्या सर्व्हिस रोड लगत दारू पिणाऱ्यांची व गांजा ओढणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याला वेळीच आळा घातला गेले नाही तर चोरी विनयभंग, खून दरोडे बलात्कार यासारख्या घटनांना प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी खुलेआमपणे रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला दारू पिणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ मंडळ सोनारी व ग्रामस्थ तसेच महिला वर्गाच्या वतीने जेएनपीटी प्रशासनाकडे व न्हावा शेवा बंदर पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे. पत्रव्यवहार करून करळ फाटा येथील जेएनपीटीच्या सर्विस रोड लगत बसणाऱ्या मद्यपी व्यसनी लोकांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी.एका व्यक्तीलाही तिथे बसून देण्यात येऊ नये अशी मागणी सोनारी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजय म्हात्रे, उपाध्यक्ष प्रशांत कडू, माजी सरपंच पूनम कडू,माजी उपसरपंच ममता कडू, सोनारी महिला मंडळ अध्यक्ष रेश्मा कडू, किशोरी कडू, पंच कमिटी व ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे. यावेळी सर्व्हिस रोड वर महिलांनी मोर्चा काढला होता. आमचा कोणालाही विरोध नाही. आमचा रोजी रोटीला विरोध नाही. कामधंद्याला विरोध नाही. आमचा विरोध फक्त रस्त्यावर व रस्त्याच्या आजूबाजूला बसणाऱ्या मद्यपी व गांजा, चरस ओढणाऱ्या व्यक्तींना आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये. हा विषय गावाचा आहे. गावच्या  प्रतिष्ठेचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेतेचा विषय आहे. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष अजय म्हात्रे यांनी केले असून सदर मद्यपीचा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी अजय म्हात्रे यांच्या सह ग्रामसुधारणा मंडळ, पंच कमिटी, महिला वर्ग तसेच ग्रामस्थांनी जेएनपीटी प्रशासनाकडे व पोलीस प्रशासनाकडे केली आहे

कोट (चौकट) :- काही दिवसापूर्वी  द्रोणागिरी नोड मध्ये एका स्थानिक गावच्या रहिवाशी असलेल्या व्यक्तीवर परप्रांतीय व्यक्ति कडुन चाकू हल्ला झाला होता. तशाच प्रकार करळ फाट्यावर सर्विस रोड लागत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या चोरी दरोडे भांडणे, मारामारी, वाद-विवाद, विनयभंग खून, बलात्कार अशा घटना टाळण्यासाठी बेकादेशीर व अनधिकृतपणे जेएनपीटी च्या सर्व्हिस रोड लगत बसणाऱ्या सर्वच मद्यपी व व्यसनी व्यक्तीवर कायमस्वरूपी कारवाई व्हायला पाहिजे असे मत सोनारी गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना महिला आघाडीचा वतीने शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांचा सत्कार......

शिवसेना महिला आघाडीचा वतीने शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांचा सत्कार......

 *निलेश सांबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे प्रश्न सोडवणार :- सौ.रूचिता अमित नाईक*

वसई विरार, प्रतिनिधी :-  शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या निलेश सांबरे साहेब यांचा वसई विरार शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निवासस्थानी भेट घेत शुभेछा दिल्या.

निलेश सांबरे साहेबांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था’ व ‘जिजाऊ संघटने च्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार, शहरी व. ग्रामीण विकास या सर्वच क्षेत्रांत मोठे काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून तीन मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, दहा इंग्रजी माध्यमाच्या मोफत सीबीएससी शाळा, पंचवीस मोफत रुग्णवाहिका सेवा, २८ मोफत आरोग्य केंद्र आणि दोन हजारांहून अधिक शहरी व ग्रामीण भागात शाखा कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचवली.

निलेश सांबरे यांचे सामाजिक कार्य, विशेषतः गोरगरीबांसाठी मोफत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली आहे. शिवसेना आता पालघर जिल्हा व कोकणात निलेश सांबरे यांच्या सहभागाने अधिक बळकट होत आहे. पक्षाचा प्रभाव आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे शिवसेना नव्या उंचीवर पोहोचण्याच्या तयारीत आहे. असे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रुचिता नाईक यांनी केले आहे.
रुचिता नाईक यांनी स्वखर्चातुन वसई तालुक्यात प्रथम 24 तास मोफत रुग्णवाहिका सुरू करत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवत मोफत सेवा देत असतात. या रुग्णवाहिकेला निलेश सांबरे साहेब यांनी भेट देत कार्याचे कौतुक केले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रुचिता नाईक, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक अल्पना सोनावणे, जया गुप्ता विभाग संघटक, तृप्ती रामपुरे, निलिमा ताई, व सर्व महिला पदाधिकारी तसेच युवा शहर प्रमुख समीर गोलांबडे, अमित नाईक, सातपुते काका उपस्थित होते.

Saturday, 28 June 2025

स्फूर्ती फाउंडेशन वतीने एक दिवसीय रेशनकार्ड शिबिर आयोजन !!

स्फूर्ती फाउंडेशन वतीने एक दिवसीय रेशनकार्ड शिबिर आयोजन !!

कल्याण प., प्रतिनिधी - स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून शंकेश्वर प्रेसिडेन्सी, आर टि.ओ.जवळ, टावरीपाडा कल्याण पश्चिम येथे शुक्रवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते दूपारी २ या वेळेत एक दिवसीय रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रेशन कार्ड ही सर्वांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या अशा कागदपत्रां पैकी एक असून या माध्यमातून सरकारी योजनेचा लाभ विविध शासकीय कार्यालयात रेशन कार्डचे महत्त्व आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिवळ्या व केशरी रेशनकार्ड कार्ड सोबत सफेद रेशनकार्डला ही आता शासकीय आरोग्य सेवेचा फायदा होणार आहे अशी घोषणा केली आहे. त्यानुसार सर्वांना या एक दिवसीय शिबिरातून नवीन रेशनकार्ड नोंदणी,नाव वाढवणे कमी करणे, रेशन दुकान व रेशनकार्ड वर पत्ता बदल, बायोमेट्रिक अशी विविध सुविधा  स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान  स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष- बजरंग तांगडकर, स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख  शिल्पा तांगडकर, व ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते व मार्गदर्शक शांताराम तांगडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वीर वाजेकर महाविद्यालय आणि केमिशिया फार्मास्युटिकल तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान !!

वीर वाजेकर महाविद्यालय आणि केमिशिया फार्मास्युटिकल तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान !!

उरण, दि २८,'(विठ्ठल ममताबादे) :
पर्यावरण संवर्धन व शाश्वत हरित उपक्रमांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फुंडे यांनी  केमिशिया फार्मास्युटिकल, तळोजा यांच्या सहकार्याने  वृक्षारोपण मोहीम राबवली. ही मोहीम प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र विभाग यांच्यामार्फत समझोता करार (एमओयू ) अंतर्गत राबविण्यात आली.

या अभियानात सुमारे १३५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. मधुमालती, करंज, काजू, अर्जुन, बदाम, बहावा, फणस, तामण, वड, आणि जांम यांसारख्या लोकोपयोगी व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. हे सर्व रोपे केमिशिया फार्मास्युटिकल, तळोजा यांनी सीएसआर उपक्रमांतर्गत भेट केली होती. वृक्षारोपण स्थळांमध्ये तु. ह. वाजेकर विद्यालय (फुंडे), टाकीगाव, बापदेव मंदिराजवळील वनक्षेत्र आणि इतर नैसर्गिक परिसरांचा समावेश होता. ह्या साठी केमिशिया फार्मास्युटिकलचे संचालक दीपक पवार आणि संतोष शिंदे उपस्थितीत होते. तसेच वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना वनसंवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि तरुणांनी पर्यावरणासाठी जबाबदारीने काम करणे यावर भर दिला.तु. ह.वाजेकर विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळुंखे, थोरात मॅडम, बाबर मॅडम, पाटील सर, सदानंद म्हात्रे, डॉ. अनिल पळवे (प्रमुख, रसायनशास्त्र विभाग) डॉ. राहुल पाटील, डॉ. जी. सी. वधवा, राम गोसावी (एन एस एस अधिकारी) व  डॉ. राजकुमार कांबळे (एन सी सी अधिकारी), एन एस एस स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्स, डॉ. संदीप घोडके, गजानन चव्हाण, फॉन सामाजिक संस्थेचे निकेतन ठाकूर, केमिशिया फार्मास्युटिकलचे सुमारे १५ कर्मचारी व महाविद्यालयातील  शिक्षकेतर कर्मचारी पंढरीनाथ घरत, आंबवकर, सौरव सकपाळ या उपक्रमात सक्रीय सहभागी झाले.

करंजा रेवस रेड्डी महामार्ग काम बंद यावर जनता ठाम !

करंजा रेवस रेड्डी महामार्ग काम बंद यावर जनता ठाम !

** अगोदर नुकसान भरपाई नंतरच काम सुरु करण्याची ग्रामपंचायतची व ग्रामस्थांची मागणी.

उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) :
दिनांक २८ जून २०२५ रोजी चाणजे ग्राम पंचायत कार्यालय करंजा, ता.उरण येथे प्रशासनाचे अधिकारी, करंजा गावांतील सात पाडे व ग्रामपंचायत हद्दीतील बाधित शेतकरी व मच्छीमार यांची बैठक संपन्न झाली. करंजा रेवस रेड्डी महामार्गावरील पुलाचे सुरू केलेले काम ग्रामस्थ व महिलां यांनी बंद पाडले आहे. ते काम सुरू होण्याचे दृष्टिकोनातून तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र मिसाळ, MSRDS चे कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध बोराडे तसेच चिफ इंजिनिअर यांचे उपस्थितीत त्यांचे आग्रहास्तव सरपंच अजय म्हात्रे यांनी मिटिंग बोलावली होती. सदर वेळी उपसरपंच श्रीमती कल्पना पाटील, माजी सभापती ऍड.सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, ऍड वेदांत नाखवा, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते. सरपंचासह सर्वजण अगोदर नुकसान भरपाई नंतरच काम सुरू यावर ठाम राहिले. 

कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नंतरच काम सुरु करा अशी भूमिका बैठकीत ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी घेतली. मात्र या बैठकीत सुद्धा कोणताही सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. शासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने मागण्या मान्य न केल्याने ग्रामस्थ, मच्छिमार बांधव नाराज झाले. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.त्यामुळे तहसीलदार उद्धव कदम, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मिटींग आटोपती घेतली. शेवटी सरपंचानी आवाहन केले की आपली अशीच एकजूट कायम ठेऊन अन्याया विरोधात लढा आणखी तिव्र करुन आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत राहू. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही हा लढा असाच सुरु राहिल अशी आक्रमक भूमिका सरपंच यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी घेतली.

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी विविध शाळांना, शैक्षणिक संस्थांना, महाविद्यालयांना मोठया प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील इयत्ता ५ वी ते १० वी त शिकत असलेल्या प्राथमिक शाळेत तसेच ११ वी व १२वीत शिकणाऱ्या फुंडे महाविद्यालयात एकूण ३००० हुन अधिक वह्यांचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर फुंडे प्राथमिक शाळेच्या सभागृहात वह्या वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सरपंच कुणाल अरुण पाटील, शिवसेना नेते कमळाकर पाटील, फुंडे हायस्कुल चेअरमन कृष्णाजी कडू, फुंडे, हायस्कुलचे प्राचार्य साळुंखे बी. बी, शिक्षक प्रविण, उपशाखाप्रमुख महेश पाटील, विनय पाटील, हृषिकेश म्हात्रे, अमित पाटील, जॊतॆश तांडेल, रोशन म्हात्रे, सुरेंद्र पाटील, प्रथम तांडेल, प्रणय पाटील यांच्यासह शाळेच्या पर्यवेक्षिका बाबर एस. एम, पाटील, एस. एस, शिक्षक पाटील, एच. एन, शिक्षक पाटील, डी. डी,शिक्षक म्हात्रे, ए. आर, उपशिक्षिका पाटील, एस. व्ही तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एच एन पाटील यांनी केले तर प्रस्तावना साळुंके बी बी यांनी केले. प्रस्तावनेत प्राचार्य साळुंके यांनी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर करून चांगले शिक्षण घेऊन प्रगती करण्याचा सल्ला दिला. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पूर्वीचे शिक्षण कशा पद्धतीचे होते शिक्षण व्यवस्था कशी होती हे सांगितले. हे सांगत असतानाच कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करते. गोर गरीब मुलांना आधार देते. गोर गरीब मुलांचे शिक्षण कुठेही अडू नये. विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती करावी हा दृष्टीकोण ठेऊन शैक्षणिक साहित्य वाटपचा हा कार्यक्रम खूपच स्तुत्य आहे. अशा शब्दात त्यांनी सरपंच कुणाल पाटील व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.जर हुशार व गुणवंत विद्यार्थी असेल व त्याची घरची परिस्थिती खराब असेल तर त्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी येऊन मला भेटावे त्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च मी स्वतः करेन. असेही आश्वासन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितांना दिले. शेवटी कार्यक्रमाचे आभार मानून सांगता झाली. शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

शिवसेनेचा ठोस इशारा — विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती चालणार नाही; आता सर्व मराठी माणसांनी एकत्र येण्याची वेळ आली !!

शिवसेनेचा ठोस इशारा — विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती चालणार नाही; आता सर्व मराठी माणसांनी एकत्र येण्याची वेळ आली !!

उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उरण तालुक्यात ठोस भूमिका घेतली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार विजय घरत व  उरण शहर संघटक  संदीप जाधव  यांच्या पुढाकारातून तालुक्यातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना अधिकृत निवेदन देऊन इशारा देण्यात आला की, “जर विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती केली गेली, तर शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल.”

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, शाळांनी विद्यार्थ्यांवर कोणतीही भाषा सक्तीने लादू नये. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या मातृभाषा, प्रादेशिक भाषा किंवा अन्य भाषांमध्ये तिसरी भाषा निवडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. हिंदी लादण्याचा कोणताही प्रयत्न घटनाविरोधी असून, अशा प्रयत्नांचा शिवसेना ठोस विरोध करेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

ओमकार घरत यांनी म्हटले की, “आज आम्ही निवेदन सादर केले आहे. पण जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर उरणमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल. हा लढा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. आता वेळ आली आहे — सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावं, पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा उंच फडकवायचा आहे!”

हे निवेदन मा.खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले असून, त्यांच्या स्पष्ट सूचनेनुसार जिल्हास्तरावर शिवसेनेने तात्काळ पावले उचलली आहेत.

या निवेदनास शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. मनोहरशेठ भोईर – माजी आमदार व जिल्हा प्रमुख रायगड, शशिकांत डोंगरे – जिल्हा संघटक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, सुनील पाटील – उपजिल्हा प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, नरेश राहाळकर – उपजिल्हा प्रमुख रायगड, संतोष ठाकूर – तालुका प्रमुख उरण, दीपक भोईर– तालुका संपर्कप्रमुख उरण, गणेश शिंदे – माजी नगराध्यक्ष व गणनेते उरण विधानसभा हे सर्व पदाधिकारी  या लढ्यात सहभागी आहेत. त्यांचा पाठिंबा सुद्धा आहे.त्यांच्या बरोबर संदीप जाधव – उरण शहर प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, ओमकार विजय घरत तालुका संघटक, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष हे पदाधिकारी सुद्धा या लढायात सहभागी झाले आहेत. या सर्व घडामोडींवर समाजात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेनेच्या या ठोस पावलांना लोकसमर्थन वाढत आहे. शाळा प्रशासन व शैक्षणिक अधिकारी यांनी योग्य ती कारवाई न केल्यास, शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष अटळ राहील असा निर्धार शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारी माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; फेसबुक लाईव्हवर थेट इशारा !!

सरकारी माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; फेसबुक लाईव्हवर थेट इशारा !!

टिटवाळा, वार्ताहर :
मांडा टिटवाळा वासुन्द्री रोड या होत असलेल्या रस्त्याच्या कामातील  सरकारी माती चोरी प्रकरण बातमीच्या माध्यमातून उघडकीस आणणाऱ्या स्थानिक पत्रकाराला खुलेआम जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. येथील स्थानिक पत्रकार अजय शेलार या पत्रकाराने काही दिवसांपूर्वी सरकारी मालमत्तेच्या गैरव्यवहारावर आधारित एक गंभीर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी प्रशासन स्तरावर सुरु झाली. मात्र, याचा राग मनात धरून संबंधित माफियांनी सोशल मीडियावरून पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह आणि धमकीजनक वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले आहे.

२७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७:५७ वाजता, संदीप नाईक नामक इसमाने फेसबुक लाईव्हवर येत पत्रकाराचे नाव घेऊन थेट धमकी दिली. “पुन्हा बातमी केलीस तर बघून घेईन,” असा थेट इशारा करत, जर पुढे पुन्हा काही प्रसिद्ध झालं, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्यात आले.

या प्रकरणामुळे पत्रकाराच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, सामाजिक माध्यमांवर त्यांची बदनामी करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित पत्रकाराने आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संदीप नाईक व त्याचे इतर तीन साथीदार हे स्थानिक माफियांच्या सांगण्यावरून कारवाई करत आहेत.

या घटनेनंतर, पत्रकाराने कल्याण तालुका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या धमक्यांमागे कोणते प्रभावशाली माती माफिया आहेत, याचा तपास करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
तक्रारीची प्रत गृह राज्यमंत्री, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण केवळ एका पत्रकाराच्या सुरक्षेचे नसून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेला हल्ला आहे. पत्रकार संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Friday, 27 June 2025

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !!

*** नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्याचे लेखी स्वरूपात आश्वसन. 

उरण, दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट  टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ती जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वुत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन पोर्ट मध्ये होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे. त्यामुळे हा विजय हा मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या विचारांचा विजय असणार आहे. असे प्रतिपादन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. 

जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट  टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने दहा दिवसापूर्वी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती( इंटरव्यू ) ह्या गुजरात राज्यातील मुद्रा या ठिकाणी घेऊन संबंधित व्यवस्थापनाने कामाचा पत्ता हा  जेएनपीटी उरण नवी मुंबई म्हणून प्रसिद्ध केले होते. एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करायचा आणि नोकर भरती मुलाखती या गुजरात राज्यात घ्यायच्या यासंदर्भात कोणीच आवाज उठवित नसल्याने स्थानिकांच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुका अध्यक्ष अँड सत्यवान भगत यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला असता या नोकर भरती प्रक्रियेची दखल मनसेचे नेते राज ठाकरे यांनी घेऊन प्रसारमाध्यमांतून आवाज उठविला. यांची दखल जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी घेऊन शुक्रवारी( दि २७) बंदर प्रशासनाच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक, मनसेचे सरचिटणीस संदिप दळवी यांनी मराठी माणसावर पोर्ट टर्मिनल कशा प्रकारे अन्याय करत आहे. ही बाब बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली. 

यावेळी जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध केली होती ती जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वुत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन पोर्ट मध्ये होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र व मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी मनसेच्या शिष्टमंडळाना दिले. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक, मनसेचे सरचिटणीस संदिप दळवी यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या वतीने बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांचे आभार व्यक्त केले. तसेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मनसे यापुढे ही आवाज उठविणार असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टचे व्यवस्थापन अधिकारी अनिरुद्ध लेले, बीएमसीटी पोर्ट चे व्यवसायिक अधिकारी मनोज गावंड, जेएनपीए बंदराच्या अधिकारी मनिषा जाधव, जेएनपीए बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अँड सत्यवान भगत, महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, प्रविण दळवी, मनसे प्रवक्ते योगेश चिले, उपजिल्हा अध्यक्ष दिपक कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू तुळशीराम ओवे, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, कविता म्हात्रे महिला तालुकाध्यक्ष, उरण शहर महिला अध्यक्ष सुप्रिया सरफरे, उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या मालती म्हात्रे, शेवा शाखाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे आदिंसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मनसे मुळे मराठी तरुणांना यामुळे न्याय मिळणार असल्याने तमाम जनतेने मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा शाहीर - सचिन धुमक

चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा शाहीर - सचिन धुमक

                 परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत अनेक रत्ने जन्माला आली आणि त्यांनी त्यांच्या जन्मभूमीच नाव मोठ केलं. असच एक कोकण भूमीत तयार झालेलं रत्न म्हणजे शाहीर सचिन धुमक चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा. बालपणापासून कलेची आवड जोपासताना वयाच्या पाचव्या वर्षी कोकणची लोककला नमन मध्ये श्री कृष्णाची भूमिका साकारत कला क्षेत्रात  पदार्पण केले.
                शालेय शिक्षण आपल्या मामाच्या गावी म्हणजे वहाळ या ठिकाणी पूर्ण करत असताना कैलासवासी लोकप्रिय शाहीर बाबाजी घडशी यांचा कलेचा वसा जोपासत त्यांचे गुण आत्मसात करत गीत लेखनास सुरुवात केली.. आजवर आपल्या लेखणीतून अनेक समाजप्रबोधनपर गीत रचना करून ती स्वरबद्ध करत समाजप्रबोधनाचे कार्य करत असतानाच नमन साठी ऐतिहासिक वगनाट्य लिहिण्यास सुरुवात केली. इतिहासाला अपरिचित असलेल्या योद्ध्याची कलाकृती रामजी पांगेरा त्यातील एक नाट्यकृती गीतकार, गायक, आणि कलाकार अशा वेळी भूमिका साकारत आपल्या पहाडी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत महाराष्ट्र गौरव भूषण मधुकर पंदेरे आणि लोकप्रिय शाहीर तुषार पंदेरे, जगन्नाथ रसाळ यांसारख्या गुरूंच्या छत्रछायेखाली बाबू रंगेले घराण्यातील तुरेवाले शाहीर म्हणून शाहिरी करण्यास सुरुवात केली. आणि आपल्या प्रबोधनात्मक शाहिरी लेखणीतून समाज प्रबोधन करत असतानाच स्वतः वस्ताद म्हणून अनेक शिष्य घडवत आहेत, सुशांत, जितेश, सागर, दीपक, किरण, सुरज, भावेश, रुपेश, महेश हे त्यांची शिष्य मंडळी भविष्यात नक्कीच रंगभूमीवर नाव कमावताना दिसून येतील.मुंबईच्या रंगमंचावर आपली शाहिरी कला सादर करत असतानाच दूरचित्रवाणी वरील कलर्स मराठी वाहिनीवर आपली कोकणची लोककला नमन सादर करण्याची संधी मिळाली.
            आपल्या प्रबोधनात्मक लेखणीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आणि त्यातून उदयास आला टीम सचिन चाहते परिवार. आपल्या प्रमाणेच प्रत्येकाकडे काही ना काही अंगीभूत कला दडलेली आहे, हा विचार त्यांचा मनाला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग त्यांनी विडा उचलला तो आपल्या चाहते परिवारातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा त्यांच्यातील कलागुणांना हेरून त्यांच्यातील कलाकार घडवण्याचा आणि त्यातूनच त्यांनी आपल्या निवडक चाहत्यांसमोर भारूडची  संकल्पना मांडली. आणि आपल्या चाहत्यांच्या सहकार्याने आज कोकणची लोककला चाहत्यांचे बहुरंगी भारुड ही संकल्पना साकार झाली.
             कोकणातील तळागाळातील कलावंतांना हक्काच व्यासपीठ सचिन धुमक आणि त्यांच्या टीम सचिन चाहते परिवार यांनी उपलब्ध करून दिले. हे सर्व करत असतानाच टीम सचिन चाहते परिवार आणि शाहीर सचिन धुमक कला क्षेत्रासोबत शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करताना दिसून येतात.. मग ते क्रिकेट सामन्याचे आयोजन असो किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला मदत करण्यात यांचा मोठा हातखंडा आहे.त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून लोकसेवा महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार तसेच सह्याद्री गौरव भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पण त्यांचा कुठे गवगवा केला नाही, आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करणारा हा कलावंत कायमच प्रसिद्धीपासून थोडा दूर राहून आपले कार्य करताना दिसून येतो.
             आपल्या शाहिरी प्रबोधनात्मक लेखणीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच. त्यांचा टीम सचिन चाहते परिवार हा कला क्षेत्रसोबतच क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करताना दिसून येतो मग ते क्रिकेट सामन्याचे आयोजन असो किंवा एखाद्या गरीब गरजू रुग्णाला मदतीचा हात असो शाहीर सचिन धुमक आणि त्यांचा टीम सचिन चाहते परिवार कायमच सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवताना दिसून येतो. यशाचे शिखर गाठत असताना अचानक ओढवलेलं आजारापणवर जिद्दीने मात करत. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अवलिया जोमाने काम करत आहे.हे सर्व करत असताना त्यांना त्याच्या कुटुंबाने आणि टीम सचिन चाहते परिवार यांची साथ लाभली त्यामुळेच आज चाहत्यांचे बहुरंगी भारुड ही संकल्पना साकार झाली.
             कोकणातील हौशी कलाकार यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे चिपळूण ढाकमोली गावचा अवलिया शाहीर सचिन धुमक आणि त्यांचा टीम सचिन चाहते परिवार तर्फे शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी दादर पश्चिम येथील प्रसिद्ध अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे रात्री ७:३० वा. शक्तीवाले शाहीर विनोद फटकरे आणि तुरेवाले शाहीर सचिन धुमक यांच्यात होणाऱ्या शक्ती-तुरा सामना कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा....! कोकणातील ही लोककला शाहीर मंडळी जोपसत आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी रसिक मायबाप आपल्या सहकार्याची गरज आहे.आम्ही तर सज्ज झालो आहोत कार्यक्रम पाहायला. तुम्ही या.. तुमच्या मित्र परिवार यांना सांगा.. सोबत घेऊन या कारण लोप पावत चाललेली ही कला जोपासायची असेल तर मुंबई मध्ये होणाऱ्या प्रत्येक शक्ती-तुरा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहा.

शब्दांकन -
शिवप्रेमी दीपक कावणकर
संकलन -श्री. शांताराम गुडेकर (+91 98207 93759)

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

श्री अरुण सुनील आडिवरेकर, गेली २३ वर्षे पत्रकारितेत काम करत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अवांतर लिखाणाची  त्यांना आवड निर्माण झाली. दैनिक रत्नागिरी टाइम्समधून लिखाण प्रसिद्ध होऊ लागले आणि हळूहळू लिखाणाची  त्यांना सवयच जडली. पुढे ते राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करू लागले. महाविद्यालयीन शिक्षण संपताच सन २००२ मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला. सुरुवातीला पत्रकार मग उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली. रत्नागिरी येथे दै.लोकमतमध्ये गेली १० वर्षे  ते काम करत आहेत. सध्या वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत आहे. महाराष्ट्र शासनाचा सन २०२२चा राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशात 'लोकमत' चा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश मिळाले आहे.

जे करायचे ते मन लावून, स्वत:ला झोकून देवून, आणि सकारात्मक दृष्टी ठेवून करायचे ही त्यांची खासियत आहे. पत्रकार क्षेत्रातील एक निगर्वी, अत्यंत उत्साही, हसतमुख असलेले श्री आडिवरेकर हे  शब्दश: एक अष्टपैलू व्यक्तीमत्व लाभलेले पत्रकार आहेत. आपल्या लेखनीच्या माध्यमातून अनेक दुर्लक्षित प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या पेशाला कुठेही गालबोट न लावता, समाजाभिमुख लेखनी लाभलेले ते लक्षवेधी पत्रकार आहेत. स्वत: बरोबरच आपल्या सहका-यांकडून ही अपेक्षित काम करवून घेण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. उपेक्षित घटकांच्या व्यथा निपक्षपातीपणे मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाचे, उच्य वैचारिक भुमिकेचे व सडेतोड लेखनीचे या पुरस्कारामुळे सार्थक झाले आहे. त्यांना हा गौरवशाली पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हाभरातून  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शब्दांकन - विलासराव कोळेकर (+91 94224 20611)

Thursday, 26 June 2025

महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल यांची एकमताने निवड !!

महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल यांची एकमताने निवड !!

** संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर, तर सचिवपदी महेश यादव यांची नियुक्ती 

** बालकांच्या वसतिगृह संस्थांचा पुढाकार, राज्यभरातील सामाजिक संस्थांची एकजूट

मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :

            महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू मुलांसाठी खाजगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वसतिगृहे चालवली जातात. शिक्षण,संगोपन आणि संस्कार देणाऱ्या या संस्थांनी गेल्या काही वर्षांमध्ये हजारो मुलांचे जीवन बदलले आहे. मात्र, अलीकडील काही अपवादात्मक घटनांमुळे संपूर्ण वसतिगृह क्षेत्रच संशयाच्या छायेत सापडले आहे. परिणामी, प्रामाणिकपणे कार्यरत संस्थांनाही नोटिसा, चौकशी आणि कारवाईचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ‘खाजगी वसतिगृह संघटना’ स्थापन केली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर (पुणे) तर कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल (मुंबई) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
                 नव्या कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश-उपाध्यक्ष -ॲड. सुजाता अंगडी, जीवन संवर्धन फाउंडेशन, ठाणे, सचिव -महेश यादव, स्पर्श शेल्टर होम, पुणे, सहसचिव- अक्षदा भोसले, अंकुर सामाजिक संस्था-डोंबिवली, कोषाध्यक्ष विश्वास लोंढे, शाश्वत उत्क्रांती प्रतिष्ठान, ठाणे, सदस्य-तेजस कोठावळे (आनंदग्राम गुरुकुल, पुणे), ॲड. राजीव करडे (श्रावण बाळ आश्रम, पुणे), प्रसाद मोहिते (प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर), दत्ता इंगळे (जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, पुणे), शरद आढाव (जनजागृती प्रतिष्ठान, अहिल्यानगर), मधुकर सोनवणे (खुशीग्राम फाऊंडेशन, लातूर), सुधीर भोसले (पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था, बीड) यांचा समावेश आहे.

        *ठोस नियमावलीची मागणी*
                    महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृहांसाठी स्पष्ट, ठोस आणि बंधनकारक नियमावलीची मागणी ही संघटना करत आहे. २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला अशी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २ नोव्हेंबर २०१५ रोजी शासन निर्णय जारी झाला, परंतु अनेक बाबी अद्याप अस्पष्ट आहेत. परिणामी, पालकांच्या संमतीने मुलांना प्रवेश देणाऱ्या वसतिगृहांवरही कारवाई होत आहे.ही संघटना शासकीय निकषांचे पालन करणाऱ्या संस्थांना संरक्षण देण्यासाठी, पारदर्शक कार्यपद्धती राबवण्यासाठी आणि बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

---------------------------------
चौकट: 

खाजगी संस्था वसतिगृह संघटना सरकारदरबारी एक संयुक्त, जबाबदार आणि कायदेशीर आवाज बनून उभे राहणार आहे. पारदर्शक कार्यपद्धती, बालकांच्या हक्कांचे रक्षण, आणि प्रामाणिक संस्था टिकवण्यासाठी सामूहिक पाठपुरावा हे संघटनेचे प्राथमिक उद्दिष्ट राहील.

महेश निंबाळकर- अध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना
---------------------
खऱ्या अर्थाने बालकांच्या संरक्षणासाठी आणि प्रामाणिक संस्थांच्या हक्कांसाठी ही संघटना लढा देणार आहे. वसतिगृह क्षेत्रात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी राज्यस्तरावर ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावेल. 

दयानंद कुबल, कार्याध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना
--------------------------------------------
महाराष्ट्रातील शकेडो खाजगी वसतिगृहे चालवणाऱ्या संस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून या संघटनेची निर्मिती झाली असून काल झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय पदाधिकारांच्या नावांची घोषणा पुणे येथे करण्यात आली.

संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हलने भारतीय चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून नियुक्ती केली‌ !!

संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हलने भारतीय चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून नियुक्ती केली‌ !!

दृष्टी, संस्कृती आणि आशेच्या माध्यमातून जागतिक कथा सशक्त बनवणे

ह्यूस्टन, टेक्सास — टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हल (TGFSF) ला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की भारतातील  चित्रपट दिग्दर्शक आणि तरुण सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व अमोल भगत यांची 2025 च्या आगामी आवृत्तीसाठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या भगत यांनी जागतिक चित्रपट क्षेत्रासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे ते युवकांसाठी एक आदर्श ठरले आहेत.

अमोल भगत यांनी अल्पवयातच २४ देशांमधील ६४ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये ज्यूरीची भूमिका पार पाडली आहे. जागतिक कला आणि संस्कृती क्षेत्रावर त्यांनी जो प्रभाव पाडला आहे, तो उल्लेखनीय आहे. त्यांच्या या निवडीमुळे भारतीय युवकांचा आत्मविश्वास उंचावला असून, दक्षिण आशियातील स्वतंत्र आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

TGFSF ची स्थापना २०२२ साली ह्यूस्टन शहरात झाली असून, आता हे फेस्टिव्हल ह्यूस्टन आर्ट अँड फॅशन वीक NGO चा भाग आहे. ही संस्था 501(c)(3) अंतर्गत नोंदणीकृत एक नॉन-प्रॉफिट संघटना आहे. हे फेस्टिव्हल अशा चित्रपटांना व्यासपीठ देते जे प्रेरणा देतात, परिवर्तन घडवतात आणि आजच्या जगासमोरील गंभीर समस्या उजेडात आणतात. हे फेस्टिव्हल विविधतेचा, सहनशक्तीचा आणि मानवी शक्तीचा उत्सव साजरा करणाऱ्या कथा सांगणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांना प्रोत्साहन देते.
---
2025 फेस्टिव्हल थीम: "Lens on Global Resilience: Documenting Hope in Crisis"

(जागतिक संघर्षातून उभ्या राहिलेल्या आशेचे दस्तावेजीकरण)

2025 च्या आवृत्तीत संपूर्ण जगातील चित्रपट निर्मात्यांना संघर्ष, नवकल्पना आणि संकटातही टिकून राहण्याच्या आशेच्या कथा सादर करण्याचे आव्हान दिले जात आहे. ही थीम केवळ समस्या दाखवण्यासाठी नसून, समाधाने, धैर्य आणि मानवी आत्म्याची ताकद दाखवण्याचे खुले निमंत्रण आहे.
---
चित्रपट दिग्दर्शकांनी का भाग घ्यावा:

🌍 जागतिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म: TGFSF च्या डिजिटल माध्यमातून तुमचा चित्रपट आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सादर करा.
🔍 दडपल्या गेलेल्या कथांना आवाज द्या: दुर्लक्षित प्रश्नांवर प्रकाश टाका आणि मानवी भावना सांगणाऱ्या अनकथित गोष्टी मांडायला मदत करा.
🤝 ऑनलाइन नेटवर्किंग: उद्योगातील तज्ज्ञ, सहकर्मी आणि बदल घडवणाऱ्यांशी संवाद साधा.
🎬 वास्तविक परिणाम: सहकार्याची, वितरणाची आणि निधी मिळवण्याची संधी मिळवा.
✊ बदल घडवा: ज्या सिनेमा चळवळीमुळे जागरूकता, सहानुभूती आणि कृती निर्माण होते, त्या प्रवाहाचा भाग व्हा.
---
अमोल भगत हे केवळ व्यावसायिक अनुभवच घेऊन येत नाहीत, तर एक अनोखी सांस्कृतिक दृष्टिकोन सुद्धा घेऊन येतात, जो TGFSF च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे फेस्टिव्हलची आंतरराष्ट्रीय पोहोच वाढेल आणि सांस्कृतिक आदानप्रदान अधिक सशक्त होईल.

> "सिनेमा हा केवळ मनोरंजन नसून तो एक आरसा आहे, एक आवाज आहे आणि एक चळवळ आहे. TGFSF मध्ये सहभागी होणं हे माझ्यासाठी सन्मान आहे, कारण इथल्या कथा बदल घडवण्याची आणि उपचार देण्याची क्षमता ठेवतात," — अमोल भगत, चित्रपट दिग्दर्शक.

जसजसे TGFSF 2025 "जागतिक सहनशक्ती" या विषयावर लक्ष केंद्रीत करत आहे, तसतसे भगत यांचे दूरदृष्टी आणि समर्पण अशा चित्रपटांना नवा प्रकाश देतील, जे खरोखर महत्त्वाचे आहेत.
---
माध्यम प्रतिनिधींनी, मुलाखतीसाठी किंवा सबमिशनसाठी संपर्क साधावा:
📧 ईमेल: info@tgfsf.org
🌐 वेबसाईट: www.tgfsf.org
📍 ह्यूस्टन, टेक्सास, अमेरिका

शब्दांकन - विलासराव कोळेकर (+91 94224 20611)


Wednesday, 25 June 2025

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !!

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !!

पुणे, प्रतिनिधी : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रती महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी संबंधित कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा राहिवासी असणे बंधनकारक आहे. वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांग कलाकार, साहित्यिकांचे वय ४० वर्षापेक्षा जास्त असावे. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यूपर्ण, दर्जेदार व मोलाची भर, तसेच योगदान कमीत कमी १५ वर्ष असावे.

वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य, कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाची महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक पासबूक, लागू असल्यास पती व पत्नीचा एकत्रित फोटो, दिव्यांगत्व असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला, राज्य, असल्यास केंद्र सरकार पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारस पत्र असल्यास तसेच अन्य पुरावे जोडावेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर १ ते ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव भूषण जोशी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप !!

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप !!
 

रायगड, प्रतिनिधी, (पी. डी. पाटील) : श्री. विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट, भांडुप, राष्ट्र सेवा दल, मुंबई आणि निर्मिती उद्धर - पाली यांच्या संयुक्त विद्यमाने खवली, उद्धर , उद्धर -कातकरीपाडा, पाली, जिल्हा रायगड येथील तीन आदिवासी पाड्यांवर आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रेनकोटचे वाटप कार्यक्रम नुकताच (दि. २५ जून, २०२५रोजी) खवली, उद्धर ,पाली येथे आयोजित केला होता. ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या गोष्टी सांगितल्या. प्रमुख पाहुणे म्हणून भावेश कोपरकर ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट यांचे वाटप करण्यात आले. 

संस्था प्रत्येक वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप करीत असते. यावर्षी ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या कविता पाटील व सुदाम सुतार तसेच  सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश उंडाळकर, प्रशांत गावंड,आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खवली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. व्ही. मोरे, उद्धर कातकरी शाळेचे मुख्याध्यापक दीपक शिंदे , उद्धर शाळेचे मुख्याध्यापक विकास चाटे आणि त्यांच्या शिक्षकवृंदानी सहकार्य केले.

* खोपोली पोलीसांची अत्यंत अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी !!

* खोपोली पोलीसांची अत्यंत अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी !!

*** सी. ई. आय. आर. तपास कार्यप्रणाली द्वारे गहाळ झालेले एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत 

*** रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. आंचल दलाल यांच्या हस्ते सदर मोबाईल मुळ मालकांना सुपुर्द

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )  खोपोली पोलीस ठाणे हद्यीतील गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 8,96,000/- रुपये किमतीचे एकुण 48 ॲन्ड्रॉईड मोबाईल सी.ई.आय. आर. या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले आहेत. 
     खोपोली पोलीस ठाणेच्या कार्य क्षेत्रातील सन 2025 सालात नागरीकांच्या गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी सी.ई.आय.आर. या माध्यमातुन जवळपास एकुण 48 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन त्याची एकुण किंमत 8,96,000/- रुपये इतकी आहे. सदरचे मिळुन आलेले एन्ड्रॉईड मोबाईल हे आज दिनांक 25.06.2025 रोजी मा.श्रीमती आँचल दलाल, पोलीस अधीक्षक, सो. रायगड-अलिबाग यांचे हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरीकांकडुन खोपोली पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      तसेच यापुर्वी देखील खोपोली पोलीस ठाणेकडे सन 2023 ते 2025 या सालात गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 110 मोबाईल सी.ई.आय.आर. या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले असुन आजपावेतो एकुण 29,00,000/- रुपये किंमतीचे एकुण 158 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत.
      सदरची कामगिरी ही रायगड जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल, मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. अभिजीत शिवथरे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक श्री. शितल राउत, पोशि/520 अमोल राठोड यांनी केलेली आहे.

जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही -* विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? पालकांना प्रश्न !

जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही -
* विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? पालकांना प्रश्न !

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र या दोन्ही शाळांमध्ये यावर्षी अजूनही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकाविनाच शाळेत बसून राहावे लागत आहे.

पालघर जिल्हा परिषदेकडून २०१७ पासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, या दोन वर्गांसाठी मानधन तत्वावर खाजगी शिक्षणाची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे मानधन जिल्हा परिषद सेस फंडातून दिले जाते. मात्र यावर्षी शाळा सुरू होऊन 15 दिवस होत आले तरीही सदर शिक्षकांची नेमणूक केली नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही शाळा अतिदुर्गम गावात आहेत, मात्र या दोन्ही शाळांमध्ये यावर्षी अजूनही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आले नसल्याने पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया
2023 सालापासून पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 44 शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत मात्र दरवर्षी या दोन वर्गांसाठी शतकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली जाते ही संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत खूप उशीर उशीर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत तातडीने कार्यवाही करून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात.
- जयेश शेलार
अध्यक्ष : पालक संघ वाडा तालुका

कार्यसम्राट आमदार व शिवसेना विभागप्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

कार्यसम्राट आमदार व शिवसेना विभागप्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

घाटकोपर, (केतन भोज) : कार्यसम्राट आमदार व शिवसेना विभागप्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच घाटकोपर पश्चिम शिवसेना उपविभागप्रमुख हरेश (अण्णा) धांद्रूत यांच्या सहयोगाने घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२६/१२७ या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी यांच्या समवेत पर्यावरण जपण्याचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी उपविभागप्रमुख हरेश(अण्णा) धांद्रूत तसेच शाखा १२६ चे शाखप्रमुख मनीष कळबे, महिला शाखासंघटिका सौ.सुवर्णा वाळुंज, शाखा क्रमांक १२७ चे शाखप्रमुख विजय कोईलकर, महिला शाखासंघटिका श्रीमती ज्योती ताई शेळके तसेच प्रभाग क्रमांक १२६/१२७ चे समन्वयक दत्ता शेट्ट केसरकर आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी उपस्थित होते.

कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम राज्यस्तरीय"कोकण दीप पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !

कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम राज्यस्तरीय"कोकण दीप पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                   कोकणदीप मासिकाचा २३ वा वर्धापन दिन मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय दादर येथे मा.ना.श्री योगेशदादा कदम (राज्यमंत्री गृह (शहरे) यांच्या उपस्थितीत मोठया थाटामाटात संपन्न झाला.यावेळी सामाजिक शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोकणदीप  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
           मंचावर श्री.सुधीरभाऊ कदम (शिवसेना संपर्क प्रमुख -दापोली विधानसभा), डॉ.सुकृत खांडेकर (जेष्ठ पत्रकार, संपादक दैनिक प्रहार), श्री संतोष परब (महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त), डॉ.राम मेस्त्री (साहित्यिक), श्री.प्रवीण घाग (गिरणी कामगार नेते), श्री रणजित जाधव, विनय शेडगे आदी मान्यवर  उपस्थित होते.
          या कार्यक्रमात कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम यांना मा.ना.श्री योगेशदादा कदम (राज्यमंत्री गृह (शहरे) यांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून मोहन जयराम कदम जमेल तशी जनसेवा करत आहेत. गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे, आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य  मार्ग दाखवणे, विद्यार्थी वर्गाला मदत करणे आदी कामात सदैव तप्तर असलेले कदम, राजेंद्र भुवड यांना राज्यस्तरीय "कोकण दीप पुरस्कार-२०२५ देऊन गौरव झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना यानिमित्ताने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधर शेडगे, सागर शेडगे, संदीप शेडगे, नितीन सुकदरे, निशांत शेडगे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसाद महाडिक यांनी केले. तर आभार प्रदर्शन संपादक श्री.दिलीप शेडगे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Tuesday, 24 June 2025

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे "कलगी-तुरा" कलेचं आयोजन !!

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे "कलगी-तुरा" कलेचं आयोजन !!

** समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा "समाजरत्न पुरस्कार - २०२५" देऊन होणार गौरव 
 

मुंबई - ( केतन भोज )

कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी /मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातील या दोन्ही सणांशी येथील लोककला निगडीत आहेत. शक्ती-तुरा (जाखडी ) हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे. गणेशोत्सवात गावतल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो. आठ गडी फेर धरून वादकांच्या भोवती नाचतात. ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो.जाखडीत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे.आता जाखडीचा जंगी सामना जणू प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. कोकणातील लोककला हीच जतन करण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी  रायगड - रत्नागिरी असा दिग्गज शाहिरांचा जंगी मुकाबला होणार आहे. यामध्ये शक्तीवाले शाहीर प्रभाकर धोपट यांच्याविरुद्ध तुरेवाले शाहिर ज्ञानदीप भोईनकर शक्ती-तुरा रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. रसिक हो आपली उपस्थिती अनमोल असून हा सामना मंगळवार दि.१५ जुलै २०२५,रोजी रात्रौ ८.३० वा.मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, पूर्व ( मुंबई ) येथे होणार आहे. या सामन्याचे आयोजन श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) यांनी केले असून अधिक माहितीसाठी किंवा तिकीटसाठी ९९३०५८५१५३ /९८३३६८९६४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

      तसेच या कार्यक्रमानिमित्त सामाजिक पटलावर अधोरेखित व्हावा असा स्तुत्य उपक्रम समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा श्री पाणबुडी देवी कलमंच,मुंबई यांच्यावतीने गौरव होणार असून त्यांना "समाजरत्न पुरस्कार - २०२५" देऊन त्यांच्या कार्याचा गौरव होणार आहे. यामध्ये प्रमोदजी गांधी -( उद्योजक/संपर्क अध्यक्ष - मनसे ता. गुहागर ), रविंद्रजी मटकर -( अध्यक्ष - नमन लोककला संस्था ( रजि.), रंगनाथ गंगाराम गोरीवले - ( चिकन्या भाई ) अध्यक्ष - भैरी भवानी देवस्थान कमिटी, धोंडिबा दळवी -(संचालक-श्री गुळंबाई देवी विकास सेवा सोसायटी,कळसगादे), दिनेशजी कुरतडकर- (संस्थापक - कोकण कलामंच, मुंबई,), अरविंद मोरे "माऊली"- ( अध्यक्ष - श्री समर्थ कृपा भजन मंडळ (नालासोपारा -विरार ) या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे निवेदन शाहीर शाहीद खेरटकर करणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ, सामाजिक मंडळांना आले सुग्गीचे दिवस !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ, सामाजिक मंडळांना आले सुग्गीचे दिवस !  

*** गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांना मिळणार मोठया प्रमाणात आर्थिक मदत.

*** गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

उरण, दि २४, (विठ्ठल ममताबादे) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात  महानगर पालिका, नगर परिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आधी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव व नवरात्रोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी दारोदारी फिरणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना किमान या वर्षी राजकीय घटकांकडून आर्थिक सहकाऱ्यासाठी फिरावे लागणार नाही. त्यामुळे या वर्षी उत्सव साजरे करणाऱ्या सामाजिक मंडळांना सुगीचे दिवस येणार आहे.यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने अ, ब व क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्या वेळापत्रकानुसार, ११ जूनपासून ते १ सप्टेंबरपर्यंत आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेनुसार प्रसिद्ध करायची आहे. तसेच निवडणुकासंबंधी विविध कार्यक्रम या वेळापत्रकानुसार पार पडायचे आहे. त्यामुळे नवी मुंबई सह इतर महानगरपालिकांची निवडणूक नोव्हेंबरपर्यंत होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे याच कालावधीत गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव व दीपावली हे सण नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर येत आहेत.नवी मुंबईत तसेच रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव, गोपाळकाला व नवरात्रोत्सव हे उत्सव येथील सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आयोजित करतात. अशा वेळी त्यांना या कार्यक्रमांच्या वर्गणीसाठी आपापल्या परिसरातील महत्वाच्या व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक, विविध पक्षातील राजकीय घटकांकडे देणगी स्वरूपात मदत मागत फिरावे लागायचे. मात्र, आता वर्गणीसाठी दारोदारी फिरणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीची आयती संधी चालून आल्याने त्यांची चंगळ होणार असल्याचे मानले जात आहे.


कोट (चौकट ):- 

निवडणुकीपूर्वी येणारे सण, उत्सव :- 

१६ ऑगस्ट-गोपाळकाला, २७ ऑगस्ट-गणेशोत्सव सुरू, ६. सप्टेंबर-विसर्जन, २२ सप्टेंबर-घटस्थापना, २ ऑक्टोबर-दसरा, १८ ऑक्टोबर-धनत्रयोदशी, २० ऑक्टोबर-नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबर-लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर-बालप्रतिपदा, दीपावली पाडवा, २३ ऑक्टोबर-भाऊबीज 

================================================================================

निवडणुकीच्या कालावधीत किंवा त्याच्या आधी इच्छुक राजकीय घटकांकडून  विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम,हळदी कुंकू सभारंभ, तीर्थस्थळे, फार्महाऊस पार्ट्या यांना मोठया प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.आता गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव, दीपावलीनंतर निवडणूक होणार असल्याने गणेशोत्सव मंडळ, गोपाळकाला मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ यांना सुगीचे दिवस आले आहेत  यात शंका नाही.
देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, उरण

पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण !!

पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण !!

** खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला आढावा.

उरण, दि २४, (विठ्ठल ममताबादे) : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल येथील लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी असणारा भारतातील हे पहिलेच विमानतळ असणार आहे. वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असलेले टर्मिनल एक सप्टेंबर २०२५ पासून सुरु होईल. येथून आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

          मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली. कामाचा संपूर्ण आढावा घेतला. अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. अदानी एरपोर्ट विभागाच्या सीईओ  मिनल नाईक, सिडको प्रोजक्ट मॅनेजर गीता पिल्ले यांनी विमानतळाच्या कामाचे सादरीकरण दिले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा प्रमुख अतुल भगत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब, तुकाराम सरख, सुनिल गोवारी, प्रसाद सोनवणे, शिवसेना उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शिवसेना संपर्क प्रमुख मंगेश राणवडे, शिवसेना महिला उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेधाताई दमडे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


          खासदार बारणे म्हणाले, पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या पनवेलमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.  मेट्रो १, मेट्रो २, मेट्रो ३ यासह वॉटर टॅक्सी, स्थानिक लोकल ट्रेन सेवा आणि भविष्यातील मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यांची थेट कनेक्टिव्हिटी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत देखील थेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. प्रदूषण रहित 'ग्रीन एअरपोर्ट' कन्सेप्ट राबविली जाणार आहे.११५० हेक्टर इतक्या मोठ्या परिसरात एअरपोर्टचा विस्तार होत आहे. विमानात इंधन भरण्याची अंडरग्राउंड पाईपलाईन तर्फे (ASF) प्रणाली कार्यन्वित केली जाणार आहे. सप्टेंबर २०२५ पासून टर्मिनल वन सुरू होणार आहे. त्याची वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. २०२९ पर्यंत टर्मिनल टू सह जवळजवळ ८० टक्के कामकाज पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. सन २०३६ पर्यंत चार टर्मिनल्स, एक व्हीआयपी टर्मिनल, जनरल एव्हिएशन (खाजगी विमाने) देशातील सर्वात मोठे कार्गो डेपो असे संपूर्ण विमानतळ शंभर टक्के विकसित होणार आहे. ३.७ किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा रनवे असणार आहे. त्यावर मोठी कार्गो विमाने व एअरबस ए ३८० सारख्या विमानांचे लँडिंग आणि उड्डाण शक्य होणार आहे. मुंबईच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ जवळ दुप्पट प्रवासी व विमानांच्या दळणवळणाची क्षमता आहे.

कोट (चौकट) :- 
विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर चालू होईल. सर्व वाहतूक व्यवस्थेला विमानसेवा जोडल्या जाणार आहेत. यामध्ये मेट्रो, भूमिगत रेल्वे, बुलेट ट्रेन या सेवेचा समावेश आहे. २०२९ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने पूर्णपणे उड्डणे घेतील. देशातील महत्वाचे व मोठे विमानतळ म्हणून याकडे पाहिले जाते. विमानतळासाठी केंद्र सरकार, सिडको यांच्या माध्यमातून लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
श्रीरंग बारणे
खासदार, मावळ

नवीमुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ?

नवीमुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ?

** महेंद्रशेठ घरत यांचा दि.बा.पाटील साहेबाना अभिवादन करत सरकारला सवाल
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कांसाठी लढले. देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहेत. उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्यांचे ते प्रणेते आहेत. त्या आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. त्यामुळे यांची जाण ठेवून तरी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ? दिबांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे. म्हणजे ते जाऊन एक तप झाले. सरकार किती दिवस चालढकल करणार, असे रोखठोक मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी दिबांच्या स्मृतीस अभिवादन करताना व्यक्त केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत काॅ. भूषण पाटील जासई येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना महेंद्र शेठ घरत यांनी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. दि. बा. पाटील साहेब ही आमची अस्मिता आहे तिला नख लावण्याचे धाडस कुणी करू नये, असे मतही महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता. २४) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांना सकाळी ९ वाजता जासई येथे अभिवादन केले. यावेळी दिबांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण केले.त्यानंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगला येथे दिबांना अभिवादन केले. यावेळी दिबांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी अतुल पाटील, मनीषा पाटील आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...