Tuesday, 17 June 2025

संकल्प जनहित समितीच्या वतीने गुढे कोंडवी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप !!

संकल्प जनहित समितीच्या वतीने गुढे कोंडवी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक  मराठी शाळा गुढे कोंडवी येथे संकल्प जनहित समिती आणि श्री लक्ष्मी नारायण विकास मंडळ यांच्या वतीने मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 
          शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी मुलांना स्कूल बॅग, वही, पेन, पट्टी, कंपास बॉक्स, छत्री व बिस्किट वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सचिन घाणेकर आणि सुदेश नावले यांनी मुलांना मार्गदर्शन केले. 
            या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हरिश्चंद्र नावले, मनोहर मोरे, रवींद्र पवार, अरविंद नावले, सुभाष नावले, संजय शिर्के, अशोक कदम, राजन खैर, अंगणवाडी सेविका शैला चव्हाण, मानसी नावले,  संकल्प जनहित समिती अध्यक्ष सचिन घाणेकर, उपाध्यक्ष सुदेश नावले, महेंद्र गमरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य महेश नावले, शैलेश खैर, गणेश अवेरे, अनंत बुर्टे, योगेश नावले, अभिजित नावले, शालिनी गोमाणे, चंद्रकांत केंबळे, राजू जाधव, दीपक जाधव यांचे लाभले. या कार्यक्रमासाठी गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सावंत गुरुजी व श्री.पवार गुरुजी यांनी केले.

No comments:

Post a Comment

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !! *** नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधा...