राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाण्यात अनाधिकृत सीडी हटवण्याकरिता करावे लागत आहे अन्न त्याग उपोषण !!
ठाणे, प्रतिनिधी :
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष ठाणे शहर युवा आघाडी, पँथर साईनाथ खरात व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सुनीता शेट्टी ह्या दिनांक 12 जून 2025 रोजी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसण्याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे थांबवण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी हे संविधानिक आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सुनील पांडे नामक व्यक्तीने सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात अनधिकृतपणे सीडी उभारलेली असून, याविरोधात सुनिता शेट्टी आणि पँथर साईनाथ खरात यांनी वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या. परंतु माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि राजकुमार यादव यांच्या राजकीय दबाव व हस्तक्षेपामुळे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या कार्यकाळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप पॅंथर साईनाथ खरात यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, दिनांक: ०२ डिसेंबर २०२४ रोजी अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनील पांडे यांनी आपल्या पत्नी आणि नात्यातील महिलांमार्फत कारवाई रोखण्यासाठी पेट्रोलसहित आत्मदहनाचा कट रचल्याचे आरोप आहेत, तरीदेखील संबंधितांवर अजून कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी न्यायालयाने सुद्धा महापालिका विधी विभागामार्फत D.P.L. ची प्रतिक्रिया करून कारवाई करण्याचे आदेश दिले असूनदेखील प्रभाग समिती अजूनही निष्क्रियच आहे. म्हणूनच निष्क्रीय प्रशासन आणि दबावाच्या व पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर प्रस्थापित राजकीय लोकांचं ऐकणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पँथर साईनाथ खरात सुनिता शेट्टी व स्थानिक रहिवासी यांनी संविधानिक मार्गाने अन्नत्याग उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मी फुले, शाहू आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचा, एक छोटासा कार्यकर्ता व छोटासा पत्रकार असल्यामुळे आजवर मला योग्यरिते न्याय मिळाला नसल्याचा आरोप खरात यांनी निवेदनात केला.
परंतु एमपीएससी दर्जाचे नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त श्री सोमनाथ बनसोडे योग्यरीत्या कारवाई करतील अशी आशा देखील खरात यांनी व्यक्त केली आहे.
This is fake news.....this case is already in court.... Sunita Shetty is one she is going every where to meet all politic leader. in front of leaders she is blaming name of Mr.EKNATH BHOIR DADA and MR.RAJKUMAR YADAV BHAI. Since from 3 yrs she is doing same to frusted some one. even Sunita sheety capture Gali place to make his house big but no body has taken any action
ReplyDeleteश्री एकनाथ दादा भोईर आणि श्री राजकुमार दादा यादव प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ... यांच्या दबावामुळे कारवाई होत नव्हती ..
ReplyDeleteसदर प्रकरण न्यायालयात आहे व न्यायालयाने सदर प्रकरणी वरती सुनावणी देखील केले D.P.L .प्रतिक्रिया पूर्ण करून सदर वादग्रस्त लोखंडी सीडीवर कारवाई करण्यात यावी परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात लोकशाही व संविधानी मार्गाने उपोषण करण्याची वेळ येत आहे..
सुनिता शेट्टी जर अनधिकृत काही अतिक्रमण करत असेल तर आपण खुशाल महानगरपालिकेत तक्रार देऊ शकता.. आपणास तो अधिकार संविधानाच्या मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला...