भिवंडीतील वळ गाव ग्रामपंचायत हद्दीतील ९ केमिकल गोदामे जाळून खाक, लगत असलेल्या गोदामानाही लागली आग !!
भिवंडी (कोपर), अरुण पाटील दिं,१६.
भिवंडी तालुक्यातील गोडाऊन पट्ट्यात असलेल्या वळ गाव ग्रामपंचायत हद्दीतील केमिकल गोदामाला भीषण आग लागून नऊ गोदामे जाळून खाक झाली आहेत तर त्या आगीची झळ लागून लगत असलेल्या इतर गोदामेही जळालेली आहेत. त्यामुळे केमिकल गोदामांचा सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भिवंडी तालुक्यात सर्वात जास्त केमिकल गोदामे ही नारपोलि पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोपर गाव, पूर्णा गाव, राहणाल गाव व वळगाव ग्रामपंचायत हद्दीत जास्त प्रमाणावर आहेत. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी हे अशिक्षित व अनुभवी नसल्या कारणाने केमिकल चढवताना व उतरवताना सुरक्षितता व योग्य उपाय योजना "न"बाळगता हाताळल्याने गळती होऊन अशाप्रकार अपघात घडत असतात.
या केमिकल गोदामानमुळे मानवी जीवितास व प्राणी मात्रस धोका निर्माण होत आहे .तसेच या अनधिकृत /बेकायदेशीर केमिकल गोदामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन ग्रामस्थांमध्ये विविध श्वसनाचे व डोळ्यांचे आजार जडले जात आहेत.
अश्या प्रकारे केमिकल /रसायने व रासायनिक पदार्थ साठवणूक करण्यासाठी ग्रामपंचायतीचा "ना "हरकत दाखला (NOC) घेणे बंधनकारक असताना देखील ग्रामपंचायत सरपंच/कमिटी या गोष्टीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना या परिसरात नेहमी घडत असतात. तसेच महाराष्ट्र नियंत्रक विस्फोटक मंडळाची परवानगी,प्रदूषण मंडळाची परवानगी व इतर आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असताना देखील हे गोडाऊन मालक /चालक अशा कोणत्याच परवानग्या घेत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे हा सर्व प्रकार चोरून/बेकायदेशीर रित्या सुरू असल्याचे सिद्ध होत असल्याने नारपोली पोलिस ठाणे व संबंधित खात्याने या सर्व बेकायदेशीर ,अनधिकृत सुरू असलेल्या केमिकल गोदामांवर कारवाई करून "सील" करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment