Thursday, 4 September 2025

मारुतीदेव देवस्थान जमिनीची केस जिंकून दिल्याबद्दल वेश्वी ग्रामस्थ आणि पंच कमिटी तर्फे ॲड. राजेंद्र मढवी यांचा जाहीर सत्कार !!

मारुतीदेव देवस्थान जमिनीची केस जिंकून दिल्याबद्दल वेश्वी ग्रामस्थ आणि पंच कमिटी तर्फे ॲड. राजेंद्र मढवी यांचा जाहीर सत्कार !!

** उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक यांचा महत्वपूर्ण निर्णय

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील वेश्वी मारुती देवस्थान यांच्या मालकीची जमीन स.नं.१५/२/अ आणि स.नं १७/१/अ ही गेल्या ७५ ते ८० वर्षापासून वेश्वी ग्रामस्थांच्या सात बारा सदरी आणि ताबेकब्जात आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिराची देखभाल, दुरुस्ती केली जात आहे. परंतु एका व्यक्तीने या जमीनवर गेल्या सात महिन्यांपूर्वी उप विभागीय अधिकारी पनवेल येथे दावा टाकला असता वेश्वी ग्रामस्थांनी उरण सामाजिक संस्थेकडे मदतीचा हात मागितला. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मढवी यांनी मारुती देवस्थान वेश्वी यांचे वकील पत्र घेऊन ही केस  लढवली आणि जिंकून दिली. त्यांना ॲड मनोज म्हात्रे, ॲड ज्योती सरोदे यांनी देखील सहकार्य केले .दिनांक ४/९/२०२५ रोजी या केसचा निकाल आल्याबरोबर वेश्वी ग्रामस्थांनी ॲड. राजेंद्र मढवी यांचा शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करून त्यांचे आभार मानले. तसेच उरण सामाजिक संस्थेचे आणि उप विभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक यांचेही आभार मानले. 

या कार्यक्रमाला त्रिंबक  मुंबईकर, रोहिदास कडू, शाम मुंबईकर, गोपाळ पाटील, अनंत पाटील, प्रदीप मुंबईकर, प्रितम पालकर, महेश नाईक, वैभव मुंबईकर, श्रीधर म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, सुभाष पाटील, दत्ता गोंधळी, वसंत मोहिते, प्रशांत पाटील, हिराजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...