Saturday, 13 December 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या पालकांची मार्गदर्शक सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या पालकांची मार्गदर्शक सभा संपन्न !!!

कुर्ला (प.) प्रतिनिधी : ता .14,
दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ७ वा. संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) ही रात्र शाळा दरवर्षी SSC बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय व उत्तम निकालाची परंपरा जपणारी शाळा म्हणून ओळखली जाते. या यशस्वी परंपरेत सातत्य राखत याही शैक्षणिक वर्षात शंभर टक्के निकाल देण्याचा निर्धार शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आगामी SSC बोर्ड परीक्षांच्या अनुषंगाने आयोजित पालक सभा आज शिस्तबद्ध व मार्गदर्शक वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ राऊत होते. यावेळी सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा सौ. हेमा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शिक्षकवर्गातून श्री. खैरनार सर, श्री. वीरकर सर, श्री. ओहाळ सर आणि इयत्ता दहावीचे पालक उपस्थित होते.

सभेची सुरुवात मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ राऊत यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. त्यांनी दहावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद करून शाळेच्या आतापर्यंतच्या सातत्यपूर्ण यशाचा उल्लेख केला. रात्र शाळेचा दरवर्षी चांगला निकाल लागत असल्याने याही वर्षी शंभर टक्के निकाल देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी शाळेमार्फत विशेष नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक विषयासाठी “२१ अपेक्षित प्रश्नसंच” विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. या अपेक्षित प्रश्नसंचांच्या आधारे अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असेही सांगण्यात आले.

विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विषयानुसार शैक्षणिक प्रगती, कमकुवत बाबी, गृहपाठाचे महत्त्व व नियमित अभ्यासाची आवश्यकता याबाबत पालकांना मार्गदर्शन केले. मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पालकांनी घरी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.

सभेदरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासंदर्भात प्रश्न व सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी घरात सकारात्मक व अभ्यासपूरक वातावरण ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.

सभेच्या शेवटी पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ही पालकसभा शाळा–पालक–विद्यार्थी यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारी ठरली.

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...