Thursday, 29 January 2026

आगरी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित महेंद्रशेठ घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव !!

आगरी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित महेंद्रशेठ घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव !!

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने आगरी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक, कामगारहिताच्या व जनसेवेतील कार्याचे कौतुक केले. पुरस्कार हा त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाची पोचपावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुरबा गणपती ट्रस्ट चे पदाधिकारी व न्हावे गावातील महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...