Saturday, 7 February 2026

द्रोणागिरीत मध्यरात्री ‘बस चोर’ जेरबंद; उरण पोलिसांची धडक कारवाई !!

द्रोणागिरीत मध्यरात्री ‘बस चोर’ जेरबंद; उरण पोलिसांची धडक कारवाई  !!

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : द्रोणागिरी  सेक्टर ५० परिसर गुरुवारी मध्यरात्री अक्षरशः हादरून गेला, जेव्हा हातात घातक हत्यार आणि चोरीची बस घेऊन फिरणाऱ्या एका खतरनाक संशयिताचा थरारक पर्दाफाश झाला. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उरण पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास संशयास्पद हालचाली करत बससह फिरणाऱ्या व्यक्तीकडे रहिवाशांचे लक्ष गेले. परिस्थितीची गंभीरता ओळखत नागरिकांनी धाडसाने त्या संशयिताला घेराव घातला. हत्यार दाखवत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरी केलेल्या या मिनी बसवर श्री चिरनेर महागणपती असे नाव आहे तर या बसचा क्रमांक एम एच झिरो थ्री सीपी सेव्हन एट सेवन सेवन हा बस क्रमांक आहे.दरम्यान, नवी मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी तब्बल २६ चोरीची वाहने हस्तगत केली असून, पकडलेला आरोपी हा मोठ्या वाहन चोरी रॅकेटचा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर बस नेमकी कुठून चोरीला गेली, याचा सखोल तपास सुरू आहे.
“नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला,” अशी प्रतिक्रिया उरण पोलिसांकडून देण्यात आली. धाडसी नागरिक आणि तत्पर पोलिसांच्या संयुक्त कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !! ** मल्लखांब, कराटे व समूहनृत्यांतून विद्यार्थ्यांचा साम...