Friday, 6 February 2026

जी.के.एस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल यूथ गेम चैंपियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर विजय !!

जी.के.एस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल यूथ गेम चैंपियनशिपमध्ये प्रथम  क्रमांकावर विजय !!

** अंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली निवड  

ठाणे (शांताराम गुडेकर)

      नॅशनल यूथ गेम चैंपियनशिप २०२५ गोवा राज्यातील मडगाव या ठिकाणी श्री.हेमंत पवार ( सचिव ) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जी.के.एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली या स्पर्धा दिनांक ३०/०१/२०२६ ते ०१/०२/२०२६ अशाप्रकारे सुरु होत्या. या स्पर्धेत महाविद्यालयातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रा सोबतच  महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयातून कबड्डी व T -20  क्रिकेट Tournament 2026 या दोन खेळासाठी दोन संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच क्रिकेट संघाने  प्रथम क्रमांक पटकावून उकृष्ट कामगिरी केली. या यशामुळे विजयी संघाचे  नेपाळ येथे अंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. या उत्तुंग यशामागे महाविद्यालयाचे खेळाडू शिक्षक व सौ.हर्षला विषे   मॅडम तसेच श्री.बाळाराम चौधरी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विजयी खेळाडूंचे महाविद्यालयाच्या संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर उप-प्राचार्य प्रा.प्रशांत तांदळे सर यांनी सर्व खेळाडू व खेळाडू शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...