कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार !!
ठाणे, प्रतिनिधी : कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने मुंबई–ठाणे परिसरात वास्तव्य करणाऱ्या काही तरुण शिवभक्त कलाकारांनी सहा वर्षांपूर्वी ‘शिवभक्त कोकण नमन’ या लोककलेची सुरुवात केली. गेल्या सहा वर्षांत अनेक ठिकाणी यशस्वी सादरीकरणे करत रसिकांची मने जिंकणारे हे नमन आता प्रथमच परदेशात सादर होणार असून ही कोकणच्या लोककलेसाठी अभिमानास्पद बाब आहे.
या उपक्रमाचे दिग्दर्शक श्री. निलेश किंजळकर असून त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व कलाकारांचे योगदान कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे या नमनामध्ये पारंपरिक रितीनुसार सर्व पात्रे पुरुष कलाकारांकडूनच साकारली जातात. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील विविध सामाजिक समस्या, जीवनशैली आणि संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवण्यात येते.
या नमनाला मार्गदर्शन करणारे श्री. सुनील सिताराम उतेकर, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण सावंतवाडी अध्यक्ष, सौ.रेखा अत्तरदे, श्री.यशवंत परब, श्री.राजू कांबळे, श्री. गणेश शंकर कांबळे, श्रीम. दिपाली आमडोस्कर आणि श्री.संजय गावडे यांनी कलाकारांचे मनोबल वाढवत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
No comments:
Post a Comment