Monday, 9 February 2026

बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण जनजागृती शिबिर संपन्न !!

ठाणे, प्रतिनिधी : नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या विद्यार्थ्यांसाठी “आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणामध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग” या विषयावर दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय जनजागृती व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री विजय जाधव (उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे), श्री यासीन तडवी (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका) तसेच सौ. मीनल वानखेडे (उपप्राचार्या, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

*बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण जनजागृती शिबिर संपन्न* !!!
ठाणे : नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या विद्यार्थ्यांसाठी “आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणामध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग” या विषयावर दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय जनजागृती व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री विजय जाधव (उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे), श्री यासीन तडवी (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका) तसेच सौ. मीनल वानखेडे (उपप्राचार्या, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या शिबिरात नागरी संरक्षण व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती देऊन विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये प्रथमोपचार, आग विझवण्याच्या पद्धती, कृत्रिम श्वसन, आपत्कालीन उचल पद्धती आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

या तीन दिवसीय शिबिरात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा TDRF चे प्रमुख श्री यासीन तडवी, नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक श्री आननसिंग गढरी, उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री बिमल नथवाणी (क्षेत्र-१), श्री कमलेश श्रीवास्तव (क्षेत्र-३), श्री कॅरमबीर सिंग भुर्जी (क्षेत्र-४), श्री हनुमान चौधरी (विभागीय क्षेत्ररक्षक, मानपाडा-डोंबिवली) तसेच स्वयंसेवक श्री रोहित सिंग राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सत्रांमध्ये श्री बिमल नथवाणी आणि श्री हनुमान चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी शिबिराच्या समारोपप्रसंगी माननीय आमदार तथा मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे श्री संजय केळकर यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्गाने नागरी संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी श्री यासीन तडवी यांनीही विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आपत्ती सजगता वाढवून आपत्ती निवारणासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन केले.

महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. मीनल वानखेडे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच नागरी संरक्षण व TDRF पथकाचे आभार मानून भविष्यातही अशा प्रकारचे शिबिर व प्रगत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यासाठी महाविद्यालय पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

या शिबिरात महाविद्यालयातील १२० विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्गातील उमालक्ष्मी पाटणे, सायली दप्तरदार व ऋषिकेश लबदे यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मा. जिल्हादंडाधिकारी तथा नियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या स्वाक्षरीचे “Successfully Completed” प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा  ** २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील...