Wednesday, 11 February 2026

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे वार्ड क्र.१२४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सकिना ताई शेख यांचा सत्कार !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे वार्ड क्र.१२४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सकिना ताई शेख यांचा सत्कार  !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभांच्यावतीने शिवसेना नेते खासदार ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अनिल भाऊ देसाई  यांच्या आदेशानुसार तसेच ग्रा.सं.क. सचिव मा.श्री.निखिलजी सावंत व श्री. अशोक शेंडे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका एन विभागांमधील झालेल्या २०२६ मुंबई महानगर पालिका मधील निवडणुकीमध्ये निवडून आलेले घाटकोपर पश्चिम मधील शाखा क्रमांक १२४ नगरसेविका सौ.सकिना ताई शेख व श्री.इब्रानभाई शेख युवासेना समन्वय याचाही सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन ग्रा.स.क. पदाधिकारी यांच्यावतिने करण्यात आले. यावेळी महीला शाखा संघटीका सौ.संगीता ताई तुळसकर, युवा सेना विभागाधिकारी कु.श्रुती खोपकर, कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर, कक्ष प्रसारक श्री.अनंत पवार, कक्ष उपसंघटक शाखा क्र १२३/१२४ श्री राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक श्री. संतोष चांदे १२३, कक्ष वार्ड संघटक शाखा क्र.१२४ निर्मला आवटे ताई, कक्ष वार्ड संघटक तानाजी सावंत १२६, कक्षप्रतिनिधी श्री प्रकाश कुष्टे, श्री रियाज शेख, श्री.प्रमोद जाधव, श्री.सचिन भालेकर, इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...