Thursday, 19 February 2026

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !!

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !!

फोर व्हीलर वाहनाचे आर्थिक नुकसान ; नुकसान भरपाई देण्याची व आरोपी वर कडक कारवाई करण्याची मागणी

++0टेम्पो गाई गुरे चोरण्यासाठी आल्याचा नागरिकांना संशय.

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : उरण मध्ये रात्री अपरात्री तसेच दिवसा कधीही वाहनांचे अपघात होत असून यात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. तर काही जणांचे अवयव निकामी झाले आहेत. वाहणाच्या अपघातामूळे वेगवेगळ्या मालमत्तेचे आर्थिक नुकसानही मोठया प्रमाणात होत आहेत. अशा घटनांना वेळीच लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

 राजेंद्र गणपत घरत (वय ५७ वर्षे) नवीन शेवा यांची हुंडाई वेणु कार नंबर MH 46 BQ 6919 ही कार दिनांक १६/२/२०२६ रोजी दुपारी ४  वाजताच्या सुमारास त्यांच्या नवीन शेवा येथील राहत्या घराच्या समोर पार्किंग मध्ये पार्क करून ठेवली होती.टेम्पो नंबर MH 46 BU 5927 वरील चालकाने राजन घरत यांच्या कारला जोरदार धडक देऊन अपघात केला. यामुळे राजन घरत यांची कार नंबर होंडाई वेणू कार नंबर MH46 BQ 6919 चे बंपर, ग्रील, पुढील नंबर प्लेट, एल ई डी लाईट, फोगलॅम्प याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही.मात्र या अपघातामुळे राजन घरत यांच्या वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटने संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अपघात करणाऱ्या सदर टेम्पो मालक, चालकावर योग्य ती कडक कारवाई करून झालेल्या वाहनाची आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राजन घरत यांनी केली आहे. आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला तरी त्याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे . अन्यथा अशा घटना उरण मध्ये वारंवार घडतील व कोणताही दोष नसताना नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊन त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.टेम्पो गाई गुरे चोरण्यासाठी आल्याचा नागरिकांना संशय आहे त्यामुळे सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !!

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !! फोर व्हीलर वाहनाचे आर्थिक नुकसान ; नुकसान भरपाई देण्याची व आरोपी वर कडक कारवाई करण्या...