Thursday, 19 February 2026

महाशिवरात्रीनिमित्त नागरी संरक्षण दलाकडून ठाणे व नवीमुंबईत उत्कृष्ट गर्दी नियंत्रण व प्रथमोपचार सेवा !!

महाशिवरात्रीनिमित्त नागरी संरक्षण दलाकडून ठाणे व नवीमुंबईत उत्कृष्ट गर्दी नियंत्रण व प्रथमोपचार सेवा !!

मुंबई, प्रतिनिधी : १९, महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नागरी संरक्षण, नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने अंबरनाथ, ठाणे व नवीमुंबई येथील प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी व सोयीसाठी उत्कृष्ट गर्दी नियंत्रण व्यवस्थापन व प्रथमोपचार सेवा राबविण्यात आली.

प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले अंबरनाथ (जि. ठाणे) येथील शिवमंदिर, ठाणे शहरातील ऐतिहासिक कौपिनेश्वर महादेव मंदिर तसेच नवीमुंबईतील कोपरखैरणे येथील चिकणेश्वर शंकर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रचंड गर्दीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकी दोन प्रथमोपचार केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रपाळी तसेच दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन पाळ्यांमध्ये नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी प्रथमोपचार सेवा उपलब्ध करून दिली. १७८० पासून ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कौपिनेश्वर महादेव मंदिरात दोन पाळ्यांमध्ये प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित ठेवून मोठ्या प्रमाणावर आलेल्या भाविकांची काळजी घेण्यात आली. यावेळी गर्दी नियंत्रणासह जखमींवर तातडीने उपचार देण्याचे उत्कृष्ट कार्य स्वयंसेवक व मानसेवी अधिकाऱ्यांनी बजावले.

मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली या तीनही ठिकाणी नागरी संरक्षण केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. या केंद्रांना मा. जिल्हादंडाधिकारी व नियंत्रक डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, IAS, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त श्री. गोयल, IAS, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच मा. श्री. संजय केळकर, आमदार व मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समूह, ठाणे यांनी भेट देऊन पाहणी केली व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमात श्री. बिमल नथवानी व श्री. कमलेश श्रीवास्तव, उपमुख्य क्षेत्ररक्षक (क्षेत्र १ व ३) यांच्यासह एकूण ८९ स्वयंसेवकांनी चोख कर्तव्य बजावले. कौपिनेश्वर महादेव मंदिर येथे सुमारे ३.५ ते ४ लाख, अंबरनाथ येथील शिवमंदिरात ७.५ ते ८ लाख तर कोपरखैरणे येथील चिकणेश्वर मंदिरात ४.५ ते ५ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

सर्व मान्यवरांनी नागरी संरक्षण दलाच्या कार्याचे मनापासून कौतुक करत पुढील काळातही असेच सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्याच्या प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.

— उपनियंत्रक,
नागरी संरक्षण, नवीमुंबई समूह, ठाणे.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

No comments:

Post a Comment

संत रविदास समता पत्रकारिता पुरस्कार २०२६’ तरुण पत्रकार संदीप साळवे यांना जाहीर !!

'संत रविदास समता पत्रकारिता पुरस्कार २०२६’ तरुण पत्रकार संदीप साळवे यांना जाहीर !! संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने द...