Thursday, 19 February 2026

संत रविदास समता पत्रकारिता पुरस्कार २०२६’ तरुण पत्रकार संदीप साळवे यांना जाहीर !!

'संत रविदास समता पत्रकारिता पुरस्कार २०२६’ तरुण पत्रकार संदीप साळवे यांना जाहीर !!

संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘संत रविदास समता पत्रकारिता पुरस्कार २०२६’ तरुण पत्रकार संदीप साळवे यांना जाहीर करण्यात आला आहे. 

हा पुरस्कार संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जात असून, शहरी भागातील वंचित घटकांचे प्रश्न, सामाजिक अन्याय आणि समतेसाठी संदीप साळवे यांनी सातत्याने केलेल्या निर्भीड व वस्तुनिष्ठ पत्रकारितेची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.

पत्रकारितेतून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले लेखन, बातम्या आणि सामाजिक प्रश्नांवरील मांडणी उल्लेखनीय ठरली असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

हा पुरस्कार सोहळा लवकरच उल्हासनगर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संदीप साळवे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

वृत्त - विशाल कुरकुटे 

No comments:

Post a Comment

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥ माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया :  किरण पडवळकर तालु...