Monday, 23 February 2026

गोरेगावांत दुर्मिळ जुनी नाणी, स्टॅम्प, तिकिटे प्रदर्शनास उदंड प्रतिसाद...

गोरेगावांत दुर्मिळ जुनी नाणी, स्टॅम्प, तिकिटे प्रदर्शनास उदंड  प्रतिसाद...

मुंबई, प्रतिनीधी :  संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ, यांनी संघाच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रमोद नवरे व  संदीप परब यांनी संग्रह केलेली ५० वर्षा पासूनची जुनी नाणी व तिकिटाचे प्रदर्शन नुकतेच ज्येष्ठ नागरिकांच्या सभागृहात संपन्न झाले.

         संदीप परब यांनी ५० वर्षा पासूनची जुनी नाणी, पोस्टाची तिकिटे, परदेशातील तिकिटे, ऐतिहासिक नाणी, प्रदर्शनात होती. प्रमोद नवरे यांनी जुन्या ट्राम, रेल्वे, परदेशातील विविध तिकिटे, बेस्ट तिकीटच्या मागील जाहिराती, विविध नोटा आदीचे भव्य संग्रह ठेवण्यात आला होता.
          हे दुर्मिळ प्रदर्शन पाहण्यासाठी, नागरी निवारा, संकल्प सोसायटी, गोकुळ धाम परिसरातील असंख्य नागरिक व शालेय विध्यार्थी यांनी खूपच गर्दी केली होती.
       प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी   अध्यक्ष - दिलीप धारकर, उपाध्यक्ष - शांताराम खामकर, सचिव - सूर्यकांत  सोंडये, उपसचिव  - अरुणा रसे, खजिनदार - अनिल परब व अन्य पदाधिकारी यांनी फारच मेहनत घेतली होती.

वृत्त - पी. डी पाटील सर, भांडूप 

No comments:

Post a Comment

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !! ** 22 विविध दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे...