संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम !!
मुंबई, प्रतिनिधी : ता. २४,
"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक प्रार्थना व देशभक्तीपर गीतांनी करण्यात आली. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांनी विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या जीवनकार्याची सविस्तर व प्रेरणादायी माहिती देत त्यांच्या त्याग, धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान, मानवतेसाठी केलेले कार्य व ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सूत्रसंचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री समाधान खैरनार यांनी केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रेरणादायी भाषणे केली. तसेच निबंध लेखन स्पर्धा, घोषवाक्य लेखन, पोस्टर प्रदर्शन, चर्चासत्र व प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मसहिष्णुता, त्यागाची भावना व सामाजिक जाणीव वृद्धिंगत झाली. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment