Monday, 23 February 2026

नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मुलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी संपन्न !

नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मुलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी संपन्न !
 
कल्याण, प्रतिनिधी : २३, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मुलभूत आपत्ती व्यवस्थापन पाठ्यक्रम क्र. ५/२०२६ यशस्वीरीत्या पार पडला. मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांसाठी सोमवार दि. १६/०२/२०२६ ते शनिवार दि. २१/०२/२०२६ या कालावधीत दुपारी १.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रशिक्षण हॉल, कल्याण कार्यालय येथे हा पाच अर्धदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पाठ्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे प्रभावी सादरीकरण श्रीमती दिपा घरत (सहाय्यक उपनियंञक) यांनी केले. त्यांना मानसेवी निदेशक श्री. रामबरण यादव, डॉ. राहुल घाटवळ, हनुमान चौधरी, कमलेश श्रीवास्तव व सगीर खान यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सहभागी २६ प्रशिक्षणार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

समारोपप्रसंगी मा. उपनियंत्रक नागरी संरक्षण श्री. विजय जाधव यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच श्री. रमेश गोरे (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र-२ कडोम), श्री. कमलेश श्रीवास्तव (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र-३ उल्हासनगर) व सगीर खान यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रशिक्षणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढून आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्याची क्षमता निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

— उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे

" सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर"

No comments:

Post a Comment

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

देव देश प्रतिष्ठानच्या पुढाकारातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !! ** 22 विविध दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे...