Monday, 9 February 2026

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

उरणमध्ये कॉंग्रेसचा शंभर टक्के विजय‌ !!

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाचा करिष्मा 

उरण दि ९,(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या कॉंग्रेसने दोन जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या होत्या. त्या दोन्ही जिंकून कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी करिष्मा केला आहे. 
जासई जिल्हा परिषदेच्या गटातून डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून ऍड. अविनाश ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवला. 

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून आलेत. रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम. आज बॅरिस्टर अ. र. अंतुले साहेब यांची जयंती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मारलेली बाजी कौतुकास्पद आहे. त्यामुळे अंतुले साहेब आणि आणि दि. बा. पाटील साहेब यांना महाविकास आघाडीचा विजय समर्पित करत आहोत."

No comments:

Post a Comment

रायगडमधील साहित्यिकांची आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान..!ॲड.गोपाळ शेळके

रायगडमधील साहित्यिकांची  आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान..! ॲड.गोपाळ शेळके  उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : रायगडमध...