Tuesday, 10 February 2026

बीएलओचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माधव सिद्धेश्वरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार !!

बीएलओचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माधव सिद्धेश्वरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार !!

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )बीएलओचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उरण नगर परिषदेचे कर्मचारी माधव काशिनाथ सिद्धेश्वरे यांचा रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सत्कार केला आहे.माधव सिद्धेश्वरे हे मतदार यादीचे पुनरनिरीक्षण कामी  बीएलओ (BLO ) म्हणून अतीशय जबाबदारीने गेले अनेक वर्षे काम करत आहेत. खऱ्या अर्थांने लोकशाही टिकली पाहीजे यासाठी उरण नगर परिषदेचे कर्मचारी माधव सिद्धेश्वरे यांनी आपले काम प्रामाणिकपणे शिस्तबद्ध पद्धतीने केल्याबद्दल म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे खजिनदार तथा कर्मचारी माधव सिद्धेश्वरे यांना रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय , अलिबाग येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असलेले कर्मचारी माधव सिद्धेश्वरे यांना म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व कामगार कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने माधव सिद्धेश्वरे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!  *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी  आरोग्...