Tuesday, 3 February 2026

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

ठाणे प्रतिनिधी: ता.३,

पत्रकारिता, प्रभावी निवेदन, चित्रपट निर्मिती-दिग्दर्शन तसेच सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान रविवारी, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे संपन्न झालेल्या Asian Youth Image Conference & Award Ceremony – 2026 या भव्य कार्यक्रमात करण्यात आला.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (IIORC मान्यताप्राप्त) संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड करण्यात आलेल्या १३० मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला माननीय श्री. विजय जाधव साहेब (उपसंचालक, नागरी संरक्षण, नवी मुंबई–ठाणे, गृह विभाग, महाराष्ट्र शासन), सुप्रसिद्ध मालिका व चित्रपट निर्माता श्री. दीपक जोशी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बोलताना श्री. दीपक जोशी यांनी माध्यमे, चित्रपट व मालिका यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी निर्मित केलेल्या विविध मालिका व चित्रपटांतून सामाजिक आशय मांडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे, प्रभावी निवेदक म्हणून अनेक कार्यक्रमांना सुसंस्कृत दिशा देणारे, तसेच चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनातून सामाजिक प्रश्न अधोरेखित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करणाऱ्या श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचा हा सन्मान तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या सन्मान सोहळ्यास प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे, पुरस्कारार्थी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या कार्याचा झालेला हा गौरव माध्यम व सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

1 comment:

  1. अभिनंदन पोपळे साहेब

    ReplyDelete

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !! उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आ...