Monday, 23 February 2026

अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी उरण कोप्रोली येथील तरुणावर गुन्हा दाखल !!

अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी उरण कोप्रोली येथील तरुणावर गुन्हा दाखल !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यात कोप्रोली येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.उरण तालुक्यात कोप्रोली येथे राहणाऱ्या शिवम जाधव (२१) असे या तरुणाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

आरोपी शिवम हा उरणच्या कोप्रोली भागात राहण्यास आहे. तर, २१ वर्षीय पीडित तरुणी पनवेल येथे राहण्यास आहे. दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामद्वारे या दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर शिवम याने पीडित तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी शिवमने पीडित तरुणीच्या नकळत स्वतःच्या मोबाइलमध्ये या खासगी क्षणांचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. दरम्यानच्या काळात काही कारणामुळे वर्षभरापूर्वी या दोघांमधील प्रेमसंबंध तुटले. त्यानंतर पीडित तरुणीने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले. ही बाब शिवम याला समजल्यानंतर त्याने पीडितेची बदनामी करण्याच्या हेतूने दोघांमधील शरीरसंबंधाचे खासगी व्हिडिओ १६ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच, पीडित तरुणीच्या परिचयातील तरुणाला व्हॉट्सऍप वर पाठवून दिले. त्यानंतर शिवम याने खासगी व्हिडिओ व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.सदर व्हिडीओ उरण तालुक्यात सर्वत्र मोठया प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...