रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली !!
उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
सद्या सुरू असलेल्या रमजाननिमित्त उरण बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. रमजान महिन्यात मुस्लिम धर्मीय (रोजा) उपवास पकडतात आणि सायंकाळी फळांचे सेवन करून इफ्तारी करतात. त्यामुळे या दिवसात फळांची मागणी वाढत असते. यंदा गुरुवारपासून रमजान मासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरण शहरातील बाजारपेठेत फळांची मागणी वाढल्याने आवक देखील वाढली आहे.
रमजान महिन्यात उपवास करताना मुस्लिम धर्मिय दिवसभर पाण्याचा एकही थेंब न पिता उपवास करतात आणि सायंकाळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. उपवास सोडताना यात रसाळ फळे अधिक असतात. त्यामुळे या दिवसात कलिंगड, आंबा, पपई, खरबूज, अननस, चिकू, द्राक्षे, संत्र अशा रसाळ फळांना अधिक मागणी असते. त्यामुळे रमजान सणानिमित्त उरण बाजारपेठेत उलाढालही वाढते. उरण बाजारपेठेतील सध्या रसाळ फळांचे दर कलिंगड ४० रु. प्रतिकिलो, चिकू १२० रु. किलो, द्राक्षे १२० रु. किलो, अननस १४० रु. किलो, पपई ७० रु. किलो,' खरबूज ५० रु. किलो, संत्र १४० रु. किलो, आंबा ३०० रु. किलो याप्रमाणे असून रमजाननिमित्त या फळांना नागरिकांकडून मोठी मागणी आहे.उरण मध्ये मुस्लिम धर्मीय बांधव मोठया प्रमाणात उपवास पकडतात त्यामुळे रमजान मध्ये फळाना मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे.
No comments:
Post a Comment