उरण बाझारात कलिंगडची विक्री तेजीत - ग्राहकांकडून कलिंगड खरेदीला पसंती
** उन्हाचा पारा वाढल्याने कलिंगडाला अच्छे दिन.
उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : सध्या सर्वत्र कडक उन्हाळा आहे.उन्हाचा पारा दिवसेन दिवस वाढत असल्याने शीत पेयांबरोबरच थंड असलेल्या कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून उरण बाझारपेठेत कलिंगडची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे .
अलिकडच्या काळात विविध संकरीत जातींचे वाण विकसित झाल्यामुळे पावसाळयात लावलेले विविध जातीचे कलिंगड आँक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यत उरण मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येते. मात्र हा मोसम हिवाळयात असल्यामुळे कलिंगडाची फारशी विक्री होतेच असे नाही, परंतू महाशिवरात्रीनंतर खऱ्या अर्थाने न उन्हाळा जाणवायला लागतो. आणि त्याचदरम्यान कलिंगडे बाजारात येतात. यावेळी उन्हाच्या वेदना उशीरा जाणवू लागल्या आहेत. होळी नंतर खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते. गेल्या आठवड्यापासून उरण मधील विविध स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास येऊ लागली. काळे आणि पट्टे असलेले कलिंगड विक्रीकरीता उरण मध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे.८० रू पासून दोनशे रूपयांपर्यंत नग विकले जात असल्याचे उरण मधील विक्रेत्यांनी सांगितले. दिवसभरात २०० ते ३०० नगाची विक्री होत असून सट्टीच्या दिवशी हा आकडा ४०० पर्यंत जातो अशी माहितीही त्यांनी दिली. एप्रिल आणि मे महिन्यात पारा आनखी चढणार आहे.त्यामुळे कलिंगड फळाळा ग्राहकांची पसंती वाढली असून कलिंगडला सध्या अच्छे दिन आले आहेत
No comments:
Post a Comment