Monday, 9 March 2026

सामाजिक कार्यासाठी सरला राजेश्वराव शेष यांना ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ !!

सामाजिक कार्यासाठी सरला राजेश्वराव शेष यांना ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ !!

नाशिक, प्रतिनिधी, ता.९– सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्रच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच महिला प्रदेश संघटक सरला राजेश्वराव शेष यांना माऊली हेल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे नुकताच ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सरला शेष यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, आध्यात्मिक व बालसंस्कार वर्ग तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना समाजकार्यात सहभागी करून घेण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी रोजगार व उद्योग प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून अनेक महिलांना व्यवसाय मार्गदर्शन दिले आहे. महिलांना संघटित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व उद्योजकतेची भावना निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

सामाजिक चळवळीत ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सरला शेष यांनी सामाजिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत मोलाचे योगदान दिले आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला संघटन मजबूत करण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करत आहेत. यापुढे महाराष्ट्रभर विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर महिला मेळावे, उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सभांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी मोठे कार्य उभारण्याचा संकल्प असल्याचे सरला राजेश्वराव शेष यांनी सांगितले.

त्यांच्या या अष्टपैलू कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार !

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार ! *डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवलीतील बा...