Saturday, 23 May 2026

आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
भूपाळी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उरण येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले . भूपाळी मध्ये वंचित बहुजन आघाडी उरण तालुका उपाध्यक्ष तुषार उत्तम गायकवाड  यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उरण क्रोप्रोली सरकारी दवाखाना मार्फत वैद्यकीय चिकित्सा डॉक्टर  डॉ. पुजा पाटील यांनी नागरिकांना तपासणी केली आणि औषध उपचार करण्यात आले. 

सेक्टर १२ द्रोणागिरी नोड रहिवाशी, भूपाळी सोसायटी द्रोणागिरी नवी मुंबई मधील रहिवाशी, भूपाळी सोसायटी द्रोणागिरी नवी मुंबई मधील रहिवाशी, भैरवी सोसायटी मधील रहिवाशी,भूपाळी गृहसंकूल, मल्हार गृहसंकूल, भैरवी गृहसंकूल आणि सेक्टर १२ मधील रहिवाशांनी महिलांनी  वृध्द व्यक्तींनी शिबीराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. या शिबिराला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला.क्रोप्रोली सरकारी दवाखाना मधील  डॉ पुजा पाटील,आरोग्य सेवक संदीप पारस्वले, सीमा बंडा आशा सेविका नवघर, अर्पणा बंडा आशा सेविका नवघर,आरोग्य सेवक हेमंत यांचे विशेष सहकार्य लाभले

No comments:

Post a Comment

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !!

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !! *डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, (राजू नलावडे...