फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान; शासकीय योजनांचा लाभ घेऊन नवे उद्योग उभारा - महाराष्ट्र वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे
“जागतिक संधींसाठी सक्षम आणि उद्योजकतेकडे वाटचाल करणारे विद्यार्थी तयार करणे हेच आमचे ध्येय” – संचालिका संगीता पाटील
जळगाव, दि. 30 मे 2026 (राहुल बैसाणे) :
एन. आय. एफ. ग्लोबल - संगीता अकॅडेमी, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” हा भव्य पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, महापौर दीपमाळा काळे व संचालिका संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वस्त्रोद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे महत्त्व व राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी उद्योग उभारावेत व रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले, तसेच बोलताना सावकारे यांनी जळगावसारख्या शहरात एन. आय. एफ. ग्लोबलसारखी संस्था कार्यरत असून येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. गेल्या 21 वर्षांत संस्थेने 15 हजारांहून अधिक विद्यार्थी घडविले असून, त्यापैकी अनेकांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लॅक्मे फॅशन वीक, लंडन फॅशन वीक, न्यूयॉर्क फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीक यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्यासपीठांवर जळगावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवून शहराचे नाव देश-विदेशात पोहोचविले असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात करिअरच्या वाढत्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी एन. आय. एफ. ग्लोबल- संगीता अकॅडेमीच्या कार्याचे तसेच संस्थेचे शिक्षकवृंद व संचालिका संगीता पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे असून त्यांना मोठी प्रेरणा देतात, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी अकॅडेमीच्या 21 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर उद्योगक्षेत्राशी जोडणारे व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इंटिरियर डिझाईन मधून मुकेश तोष्णीवाल, योगिता शर्मा, रितेश तुलसाणी, चार्मी नथाणी, विराज पटेल, पार्थ पटेल, अक्षता बखतवाणी, फिल्झा शेख, मयूर जाधव,सप्रसाद अकोले, जयेश जैन, पूजा बोरसे, अंजली जोशी, रुपेश पाटील, प्रफुल चौधरी, रितू मकडीया, कोमल ओझा, खुशी डहाळे, मयूर हिंगे, आचल बयास, झैन पटेल, शुभांगी वानखेडे, शारिक हुसेन, विवेक दांडगे, मानस जैन, चचंल साहित्या, तन्मय बेलोकार, खुशबू पाटील, चैताली चौधरी, रिया चोथवे, निशांत चवराई, विवेक सपाटे, शुभम गोरे, विशाल मधयानी, आयुष पटेल, विवेक सोनार, प्रज्वल अग्रवाल, रोहित साहनी, कार्तिक पटेल, पूजा पाटील, कार्तिक जैन, हर्षल सिखवाल आणि फॅशन डिझाईन मधून स्नेहा मोरे, मयुरी बोहरे, शेजल गोपालदास, मानसी मलिचकर, रुणाली पाटील, तानिया कुकरेजा, भुवनेश्वरी करंकाल, दिव्यानी देशमुख, कोयल कोळी, स्नेहल ब्राह्मणकर, अरुण अर्जुन भिल, केसर जोशी, नेहा देसले, भाग्यश्री ठाकूर, अनम अन्सारी या गुणवंत विद्यार्थ्यांना “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानसी जैन व तेजस्विनी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सेदुलक्ष्मी मलबारी यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला असून, जळगावच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या यशाचा अभिमान व्यक्त करण्याचा हा संस्मरणीय क्षण ठरला.
No comments:
Post a Comment