आंबिवलीतील नागरिकांचा पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात ठिय्या !!
** संतप्त महिलांनी बेकायदेशीर नळ जोडण्या खंडीत करण्याची केली मागणी
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून पाणीपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त महिला व नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले.
आंबिवली अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ साईकृपा चाळ धर्मात्मा नगर ज्योतिर्लिंग चाळ आदी भागात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
येथील काही भागांमध्ये बेकायदेशीर नळ जोडणी मोठ्या प्रमाणात झाल्या असून अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असूनही आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे रेशमा बोत्रे जयश्री ढेकळे यांनी सांगितले.
“घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या आंदोलन करणाऱ्या महिलांची पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी भेट घेऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे पाणी समस्या मार्गी न लागल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment