Wednesday, 17 June 2026

'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे सामूहिक व्यसनमुक्ती शपथ !

'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे सामूहिक व्यसनमुक्ती शपथ !

व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती उपक्रम

ठाणे, प्रतिनिधी : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत देशातील अमली पदार्थांचे सेवन रोखणे, मादक पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे तसेच नागरिकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 'मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना' राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दि. १७ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद, ठाणे येथील सभागृहात 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत सामूहिक व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा केली.

या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत १५ ऑगस्ट २०२० रोजी सुरू करण्यात आलेले 'नशा मुक्त भारत अभियान' आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत दरवर्षी २६ जून हा आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने यावर्षी १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत 'नशा मुक्त भारत अभियान – विकसित भारत की पहचान' या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती कार्यक्रम, उपक्रम, शपथविधी, सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार व प्रसिध्दी मोहिमा राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी घेण्यात आलेल्या शपथेमध्ये, "मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करीन तसेच इतरांनाही व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त, निरोगी समाज घडविण्यासाठी कटिबद्ध राहीन आणि एकत्र येऊन नशामुक्त भारत घडविण्यास हातभार लावीन," असा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करून युवकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्य

No comments:

Post a Comment

अनुसूचित जाती व नवबौध्द स्वयंसहायता बचत गटांसाठी*मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन !!

अनुसूचित जाती व नवबौध्द स्वयंसहायता बचत गटांसाठी*मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन !! अनुसूचित जाती व नवबौ...