Sunday, 2 August 2026

डोंबिवली एमआयडीसी निवासीत झाड कोसळून 2 वाहनांचे नुकसान; जीवितहानी टळली !!

डोंबिवली एमआयडीसी निवासीत झाड कोसळून 2 वाहनांचे नुकसान; जीवितहानी टळली !!

*डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, राजू नलावडे*

डोंबिवली एमआयडीसी निवासी, सुदर्शन नगर येथील ओम अगत्य सोसायटी RX 16/17 च्या आवारात आज सोमवारी सकाळी एक मोठे औदुंबराचे झाड कोसळले. यामध्ये दोन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी तेथे कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

*अग्निशमन दलाने झाड हटवले*  
ही माहिती याच सोसायटीत राहणाऱ्या श्री. सोमा नायर यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कोसळले झाड बाजूला केले.

*धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर*  
एमआयडीसी निवासी परिसरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावर्षी पावसाळ्यात फक्त एमआयडीसी निवासी परिसरातच सुमारे 15 झाडे पडल्याची माहिती आहे.

स्थानिक नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसीने परिसरातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून ती तोडावीत अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !!

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !! *डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, (राजू नलावडे...