मालेवाडी येथील धनंजय संजय शेवाळे यांचा प्रशस्तीपत्र देवून प्रांताधिका-यांच्या हस्ते सत्कार !
ईश्वरपुर येथे महसूल दिनानिमित्त तहसील ऑफिस वाळवा - ईश्वरपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये श्री धनंजय शेवाळे यांनी महसूल वर्ष सन २०२५-२०२६ मध्ये प्रशासकीय कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने, तन्मयतेने व अचूकपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानपूर्वक व समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
गेल्या वर्षभरात सन 2025-26 सालातील महसूल प्रशासनातील ग्राम महसुल अधिकारी (तलाठी ) धनंजय संजय शेवाळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्री.श्रीनिवास अर्जुन होते. वाळवा तहसीलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी धनंजय संजय शेवाळे (ग्राम महसूल अधिकारी चिकुर्डे) व विनायक बेडगे (ग्राम महसूल अधिकार कापूसखेड) यांचा सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला . सदर कार्यक्रमात तहसीलदार वाळवा ईश्वरपूरच्या श्रीमती सारिका रासकर तसेच तालुक्यातील महसूल कर्मचारी, आष्टा अप्पर तहसील अप्पर तहसीलदार तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वाळवा-ईश्वरपुर मधील महसुल अधिकारी ,कर्मचारी आदींच्या उपस्थितीत महसुल दिन उत्साहात पार पडला.
No comments:
Post a Comment