*गुणगौरव सोहळा* : *बहुजन विकास आघाडीचा वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान !!
*कार्यक्रमास समाजसेविका रूचिता नाईक यांची उपस्थिती...*
नालासोपारा ता, १ :- बहुजन विकास आघाडीचा वतीने २०२५-२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव, त्यांच्या मेहनतीचे कौतुक आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा हा सोहळा .
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मा.आमदार क्षितिज दादा ठाकुर तसेच उपमहापौर मार्शल लोपीस व नगरसेविकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आमदार क्षितीज ठाकुर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि सर्व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. यशामागील सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जीवनात यश आणि अपयश दोन्हींचे समतोलपणे स्वागत करा. समाजातून खूप काही शिकता येते. साधेपणातच खरी शिस्त आणि संस्कार दडलेले असतात. गुणवत्तेबरोबरच खेळ, वक्तृत्व, सांस्कृतिक उपक्रम आणि माणसे जोडण्याची कला आत्मसात करा. मोठी स्वप्ने पाहा, आव्हानांना सामोरे जा, प्रत्येक संधीचा उपयोग करा, अनुभवातून शिका, प्रश्न विचारण्याची सवय लावा आणि विविध क्षेत्रांची माहिती मिळवा. करिअर हा केवळ व्यवसाय नसून आयुष्य आनंदाने जगण्याचा मार्ग आहे.” उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमास मा.आमदार क्षितीज दादा ठाकुर, उपमहापौर मार्शल लोपीस, नगरसेवक, बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते, युवा पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम कुठे झाला ?
ReplyDelete