Thursday, 6 August 2026

लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मानवी हक्क आयोगात तक्रार; १४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी !!

लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मानवी हक्क आयोगात तक्रार; १४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी !!

खेड | ५ ऑगस्ट — रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मानवी हक्क आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सुनावणी पार पडली असून, आयोगाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

तक्रारदार संजय कोकरे, अध्यक्ष, स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती यांनी कंपनीत अत्यंत धोकादायक रसायनांचे उत्पादन होत असल्याचा आरोप करत संबंधित कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी कंपनी बंद करण्याची मागणीही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनावणीदरम्यान आंदोलनकर्ते अशोकराव जाधव, सुरेश रानडे, डॉ. मंगेश सावंत, सुनील जाधव आणि आल्हाद पाटील उपस्थित होते. पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते अशोकराव जाधव यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर संबंधित कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आयोगाच्या पुढील सुनावणीत या प्रकरणातील विविध मुद्द्यांवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

समेळपाडा मध्ये नागरी समस्यांत वाढ; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिणाम....

समेळपाडा मध्ये नागरी समस्यांत वाढ; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिणाम.... *प्रभाग क्र ११ मधिल समस्यांबाबत समाजसेविका रूचिता नाईक यांचे महापौ...