Sunday, 16 August 2026

मुरबाड : कळमखांडे गावात प्रहार अपंग क्रांती संघटनेची शाखा सुरू; दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढ्याचा निर्धार !!

मुरबाड : कळमखांडे गावात प्रहार अपंग क्रांती संघटनेची शाखा सुरू; दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढ्याचा निर्धार !!

*मुरबाड, प्रतिनिधी* : स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ही केवळ शाखेची सुरुवात नसून, दिव्यांग बांधवांच्या हक्क, सन्मान आणि न्यायासाठी एकजुटीने लढण्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

*दिव्यांग बांधवांसाठी सक्षम व्यासपीठ*  
या शाखेच्या माध्यमातून गावातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या प्रश्नांसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कळमखांडे गावातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

*आमदारांच्या उदासीनतेवर टीका*  
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रहार अपंग क्रांती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर टीका केली. 
ते म्हणाले, "मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची ठाणे जिल्ह्यातील सर्वात कार्यक्षम आमदार अशी ओळख आहे. त्यांनी रस्ते आणि इतर विकास कामे चांगली केली आहेत. परंतु मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या बाबतीत मात्र त्यांची उदासीनता दिसून येते."

पुढे बोलताना ॲड. पाटील म्हणाले, "प्रत्येक आमदाराला शासनाकडून दरवर्षी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला जातो. त्या निधीतून आपल्या मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकली पुरविणे, त्यांना रोजगारासाठी स्टॉल उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे अपेक्षित आहे. सामान्य माणूसही दिव्यांगाला मदत करतो, पण आमदारांनी याबाबत दाखवलेली उदासीनता अक्षम्य आहे."

*मिरा-भाईंदरचे उदाहरण*  
दिव्यांगांसाठी निधीचा योग्य वापर कसा करता येतो, याचे उदाहरण देताना त्यांनी मिरा-भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्याचा उल्लेख केला. सरनाईक यांनी दिव्यांग निधीतून अनेकांना इलेक्ट्रिक सायकली आणि स्टॉल देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघटना कायम लढत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !! अंबरनाथ | १५ ऑगस्ट २०२६ : भा...