डोंबिवली : क्षयरुग्णांसाठी रोटरी क्लबचा ‘निक्षय मित्र’ उपक्रम; शुक्रवारी उद्घाटन !!
*डोंबिवली, प्रतिनिधी* : क्षयरोगाविरुद्धच्या (टीबी) लढ्यात रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबतच योग्य पोषण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने क्षयरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘निक्षय मित्र प्रकल्प’ हा विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.
*के डी एम सी आयुक्तांची प्रमुख उपस्थिती*
या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता डोंबिवली पूर्व येथील रोटरी भवन येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
*रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप*
उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना उपचाराच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पौष्टिक अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्ये, धान्य आणि स्वयंपाकाचे तेल यांसारख्या रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा समावेश असेल.
योग्य पोषणामुळे रुग्णांच्या आरोग्यात जलद सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास रोटरी क्लबने व्यक्त केला आहे.
वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment