राष्ट्रीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न !!
चाळीसगाव (प्रतिनिधी) :
स्थानिक राष्ट्रीय महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून डेंग्यू, कीटकजन्य व जलजन्य आजार तसेच एच.आय.व्ही./एड्स आणि कुष्ठरोग जनजागृतीपर आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले.
सहायक संचालक हिवताप _ नाशिक डॉ.विवेक खतगावकर,
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार तसेच नगर परिषद मुख्याधिकारी हनुमंत बांगर व हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील समुपदेशक (कौन्सेलर) नामदेव अहिरे, LSO सचिन महाले, दीपक ठाकरे, चंद्रकांत चौधरी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे व उपाय, जलजन्य व साथीच्या आजारांपासून घ्यावयाची काळजी, तसेच एच.आय.व्ही. एड्स आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परिसरातील विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment