न्हावा शेवा पोलीस विभागात मद्यपान व्यसनाबाबत जनजागृती उपक्रम !!
उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नशामुक्त भारत अभियान अंतर्गत दर्शन नाईक, प्रतीक अमृते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्हावा शेवा पोलीस विभागासाठी मद्यपानाच्या व्यसनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला.
या उपक्रमाद्वारे मद्यपान हे केवळ व्यसन नसून एक आजार आहे, हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. मद्यपानाचे व्यसन कोणत्याही व्यक्तीला तिचे वय, व्यवसाय, जात किंवा सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी न पाहता होऊ शकते. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीकडे दोषी म्हणून न पाहता तिला योग्य उपचार, आधार आणि पुनर्वसनाची संधी देणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमासाठी न्हावा शेवा पोर्ट डिव्हिजन, नवी मुंबईचे एसीपी विजय चौधरी आणि न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाटील यांनी मद्यपानाच्या समस्येची गंभीरता ओळखून या जनजागृती उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल दर्शन नाईक, प्रतीक अमृते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment