*नागरी संरक्षण क्षेत्ररक्षक प्रशिक्षण वर्ग क्र. ०१/२०२६ ची सांगता; २६ स्वयंसेवकांनी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिली* !!!
कल्याण | १४ ऑगस्ट २०२६ :
नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत आणि मा. सहायक उपनियंत्रक श्री. विजय जाधव साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक १० ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नागरी संरक्षण कार्यालय, कल्याण येथे नागरी संरक्षण क्षेत्ररक्षक प्रशिक्षण वर्ग क्र. ०१/२०२६ आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षण वर्गामध्ये स्वयंसेवकांना नागरी संरक्षणाचे कार्य, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची दक्षता, आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रत्यक्ष परिस्थितीत प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी निर्धारित वेळापत्रकानुसार प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांची लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण २६ स्वयंसेवक उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान प्राप्त झालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यक्षमतेचे मूल्यमापन या परीक्षेच्या माध्यमातून करण्यात आले.
सदर प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण प्रभारी सौ. दिपा घरत, सहाय्यक उपनिरीक्षक (सउनि.) तसेच डॉ. घाटवळ, मानसेवी निदेशक यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव साहेब यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. नागरी संरक्षणाच्या कार्यात स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रशिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये शिस्त, सेवाभाव, आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने कार्य करण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या प्रशिक्षण वर्गाची सांगता लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेने करण्यात आली.
नागरी संरक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित आणि सक्षम स्वयंसेवकांची फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न झाला.
माहितीकरिता सादर.
Regards,
सहायक उपनियंत्रक
नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे
No comments:
Post a Comment