Friday, 21 August 2026

*तुकाराम मुंढेंचा नवा आदेश! खाद्य तेल उत्पादकांपासून किराणा दुकानदारांपर्यंत सर्वांचे धाबे दणाणले*

*मुंबई, प्रतिनिधी* : दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीवर कारवाई केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्य तेलातील भेसळीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

*भेसळखोरांवर थेट कारवाईचा इशारा*  
खाद्य तेलातील भेसळ, अनधिकृत मिश्रण, एक्सपायरी झालेल्या तेलाचे पुनर्पॅकिंग आणि हॉटेल्समध्ये वारंवार तळणीचे तेल वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुंढे यांनी दिला आहे. 

मुंढे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील खाद्यतेल उत्पादक, वितरक, किराणा दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

*नवीन नियम काय आहेत?*  
FDA ने दिलेल्या निर्देशानुसार,
1.  *सुट्या स्वरूपात खाद्यतेल विक्री करता येणार नाही.* तेल सीलबंद पॅकिंगमध्येच विकावे लागणार आहे.
2.  उत्पादक आणि विक्रेत्यांनी पॅकेजिंग आणि लेबलिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
3.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द करण्यासह दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

*ग्राहकांसाठी महत्त्वाचे आवाहन*  
या पार्श्वभूमीवर ग्राहकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तेल खरेदी करताना पॅकिंगचे सील, लेबलवरील माहिती, कंपनीचे नाव आणि एक्सपायरी डेट तपासूनच तेल खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

केबल फॉल्टसाठी  मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !! *डोंबिवली, दि. 20 ऑगस्ट 2026* डोंबिवली एमआयडीसी नि...