Tuesday, 1 September 2026

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात, तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास सुमारे ९३ सार्वजनिक आणि ४ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव साजरे होणार असून यासाठी १९ गणेशघाटावर 'श्री, चे विसर्जन होणार आहे. या करिता ८६ अंमलदार, १० पोलीसअधिकारी, होमगार्ड, पोलीस पाटील हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु विसर्जन घाट, रस्त्यावरील खड्डे चिखल पाहता इतर विभागाचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात विशेष:ता मुंबई, ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, यावेळी पोलीस यंत्रणेवर प्रंचड ताण येतो, केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी ८० ते ९० कर्मचारी आहेत, अशातच आता गणेशोत्सव तोडांवर आला आहे, या पोलीस ठाण्यातंर्गत ९३ सार्वजनिक तर ४ हजार ५०० घरगुती गणेशाची स्थापना होणार आहे, बाप्पाच्या विसर्जनासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीच्या काठावर तसेच काही ठिकाणी गाव तलावात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, असे १९ घाट आहेत, परंतु या घाटांची सध्याची परिस्थिती पाहिली तर हे विसर्जन घाटआहे की एखादे दलदल खाडी, अशी स्थिती दिसून येत आहे. काही ठिकाणी या घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या, उखडलेल्या दिसून येत आहेत, मागील काही वर्षाचा विचार केला तर गणेश विसर्जन दरम्यान अनेक गणेशभक्त बुडवून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत असेल अथवा महसूल विभाग असेल यांनी गणेशोत्सवापूर्वी या घाटांची दुरुस्ती, दिवाबत्ती ची सोय, जीवरक्षक नेमणे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी उपाययोजना वेळीच केल्या तर यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो, यासाठी प्रशासनासह नागरिक व गणेश भक्तांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास ढगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ? क...